उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक एन्काऊंटर; भाजपा आमदार हत्याकांडातील गँगस्टरचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 08:05 AM2020-08-09T08:05:06+5:302020-08-09T08:06:51+5:30
भाजपा आमदाराच्या हत्येनंतर अन्सारीचे नाव प्रकाशझोतात आले होते. जवळपास अर्धा डझन गुंडांनी राय आणि त्यांच्या ६ सहकाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्यांनी मारण्यात आले होते.
भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येचा आरोपी आणि गँगस्टर राकेश पांडे याचा एन्काऊंटर करण्य़ात आला आहे. त्याच्यावर 1 लाखाचा इनाम ठेवण्यात आला होता.
राकेश पांडे उर्फ हनुमान पांडे याला उत्तर प्रदेशपोलिसांनी एन्काऊंटरमध्ये संपविले. गेल्या महिन्यात 8 पोलिसांचे हत्याकांड करणाऱ्या गँगस्टरलाही पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. राकेश हा मुख्तार अन्सारी आणि मुन्ना बजरंगीचा जवळचा होता. लखनऊच्या सरोजिनीनगरमध्ये एसटीएफने राकेशचे एन्काऊंटर केले. बजरंगीच्या हत्येनंतर अन्सारीची टोळी राकेशच चालवत होता. अन्सारी गँगचा तो मोठा शूटर बनला होता.
राकेश हा अनेक हत्यांमध्ये सहभागी होती. यापैकी एक भाजपाच्या आमदारांची होती. तसेच मऊचा ठेकेदार अजय प्रकाश सिंह आणि अन्य एकाच्या दुहेरी हत्याकांडामध्येही त्याची मुख्य भूमिका होती. राकेशवर मोठमोठ्या लोकांच्या हत्येचे गुन्हे होते. त्याच्यावर लखनऊसह रायबरेली, गाझीपूर आणि मऊमध्ये 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भाजपा आमदाराच्या हत्येनंतर अन्सारीचे नाव प्रकाशझोतात आले होते. जवळपास अर्धा डझन गुंडांनी राय आणि त्यांच्या ६ सहकाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्यांनी मारण्यात आले होते. या सातही लोकांच्या मृतदेहातून तब्बल 67 गोळ्या काढण्यात आल्या होत्या. या प्रकरणातले महत्वाचा पुरावा म्हमून साक्षीदार शशिकांत राय यांचा 2006 मध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यांनी राय यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटविली होती. या हत्याकांडाने उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
आजचे राशीभविष्य - 9 ऑगस्ट 2020; वृषभ राशीच्या लग्नाळुंसाठी विवाहाचे योग
नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा
मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली
सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...