सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा उघड; TRP घोटाळ्याप्रकरणी ३० लाख घेतल्याने ईडी करणार सखोल चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 06:04 PM2021-04-11T18:04:26+5:302021-04-11T18:05:05+5:30

Sachin Vaze : ईडी  आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Another feat of Sachin Vaze revealed; Taking Rs 30 lakh in TRP scam, ED will conduct a thorough inquiry | सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा उघड; TRP घोटाळ्याप्रकरणी ३० लाख घेतल्याने ईडी करणार सखोल चौकशी 

सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा उघड; TRP घोटाळ्याप्रकरणी ३० लाख घेतल्याने ईडी करणार सखोल चौकशी 

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बार्क’(BARC) कडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या मदतीने ३० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

निलंबित सहाय्य्क पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर आता त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. मात्र, वाझे यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. टीआरपी घोटाळ्यातही वाझेंनी ३० लाख रुपये घेतले होते, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ईडी  आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

‘बार्क’(BARC) कडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या मदतीने ३० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह यांना त्रास न देण्याच्या नावाखाली वाझेंनी लाच घेतल्याची चर्चा होतं आहे. रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी ४०० ते ५०० रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे.

त्यातच भाजप नेते आशिष शेलार यांनी ‘सचिन वाझे टोळी टीआरपी घोटाळ्यात सहभागी असल्याचा दावा १५ मार्च २०२१ रोजीच केला होता’ असे नमूद करणारे ट्विट केले होते.

Web Title: Another feat of Sachin Vaze revealed; Taking Rs 30 lakh in TRP scam, ED will conduct a thorough inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.