राजस्थानमध्ये उभे राहिले दुसरे ‘जामतारा’, १२ वर्षांच्या मुलाने घातला कोट्यवधींचा गंडा

By मनीषा म्हात्रे | Published: January 3, 2023 07:50 AM2023-01-03T07:50:18+5:302023-01-03T07:50:45+5:30

गावातील सख्ख्या भावंडांनी सुरू केलेल्या या टोळीत गावातील ८०० हून अधिक रहिवासी ओएलएक्स फसवणुकीत गुंतल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांनी ओएलएक्स टोळीवर केलेल्या कारवाईनंतर समोर आली आहे. 

Another 'Jamtara' stood up in Rajasthan, a 12-year-old boy made a scam worth crores | राजस्थानमध्ये उभे राहिले दुसरे ‘जामतारा’, १२ वर्षांच्या मुलाने घातला कोट्यवधींचा गंडा

राजस्थानमध्ये उभे राहिले दुसरे ‘जामतारा’, १२ वर्षांच्या मुलाने घातला कोट्यवधींचा गंडा

Next

- मनीषा म्हात्रे 

मुंबई :  राजस्थानातील भरतपूरच्या खोह चौराहा गाव हे देशातील सर्वच तपास यंत्रणांची डोकेदुखी ठरलेल्या झारखंडमधील जामताराप्रमाणे दुसरे जामातारा ठरण्याआधीच  मुंबई सायबर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गावातील सख्ख्या भावंडांनी सुरू केलेल्या या टोळीत गावातील ८०० हून अधिक रहिवासी ओएलएक्स फसवणुकीत गुंतल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांनी ओएलएक्स टोळीवर केलेल्या कारवाईनंतर समोर आली आहे. 

या छोट्याशा गावातील नागरिकांचे ओएलएक्स फसवणूक हे उत्पन्नाची वाट बनल्याचे कारवाईतून दिसून आले. ओएलएक्सवरून बरोबरच सेक्सटॉर्शन गुन्ह्यातही त्यांचा सहभाग दिसून आला आहे. या गावातील फरार असलेल्या उमेर, जुनी आणि अब्बास या भावंडँनी ओएलएक्सवरून फसवणूक करण्यास सुरुवात केली. पुढे, या टोळीच्या म्होरक्यांपैकी एक असलेल्या सवसुख उर्फ सर्वसुख खुटटा रूजदार उर्फ समशू ( ३७)च्या  संपर्कात आले.

समशूविरोधात राजस्थानमध्ये हत्येचा प्रयत्न यासारख्या १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानेच, दहावी, बारावी बेरोजगार तरुणांना हाताशी घेत फसवणुकीचे जाळे विणले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या विरोधातील तक्रारीचा सूर २६९ पर्यंत पोहोचला आहे.  गेल्या दोन वर्षांत त्यांनी महाराष्ट्रासह १९ राज्यांतील नागरिकांना टार्गेट केले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण यामध्ये अडकला आहे.

रात्री ८ ते ९ नंतर ही मंडळी आलेल्या माहितीच्या आधारे फसवणुकीसाठी सज्ज होतात. रात्रभर सर्व कामकाज झाल्यानंतर पहाटे गावापासून लांब जात आलेल्या रकमेचे ठरल्याप्रमाणे वाटप करायचे. हा त्यांचा दिनक्रम होता. प्रत्येकवेळी नवीन सिमकार्ड, नवीन मोबाइल आणि नवीन ठिकाणांचा आधार घेत असल्याचे तपासात समोर आले. 

अल्पवयीन मुलांचाही समावेश 
या टोळीतील १२ वर्षांच्या मुलाने आतापर्यंत दोन कोटींची फसवणूक केल्याची माहितीही समोर येत आहे. त्यांच्या टोळीतील तो हुकमी एक्का असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत सायबर पोलिस अधिक तपास करत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलेदेखील यामध्ये गुंतत असल्याची चिंताजनक बाब यातून दिसून आली. 

Web Title: Another 'Jamtara' stood up in Rajasthan, a 12-year-old boy made a scam worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.