बिटकॉईनप्रकरणी दिल्लीतून आणखी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:41 AM2018-12-26T01:41:20+5:302018-12-26T01:41:28+5:30

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधीची फसवणूक केल्या प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने एकाला दिल्लीतून अटक केली आहे़

 Another person arrested in Delhi on the case of bitcoin | बिटकॉईनप्रकरणी दिल्लीतून आणखी एकाला अटक

बिटकॉईनप्रकरणी दिल्लीतून आणखी एकाला अटक

Next

पुणे : बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधीची फसवणूक केल्या प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने एकाला दिल्लीतून अटक केली आहे़
सुरेंद्रसिंह अलग (रा. विकासपुरी, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेन बिटकॉईन या कंपनीच्या माध्यमातून मुख्य सूत्रधार अमित भारद्वाजने पुण्यासह देशभरातील अनेकांची फसवणूक केली होती. या गुन्हयात तपास करुन सायबर गुन्हे शाखेने भारद्वाजसह १० जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे़ दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सुरेंद्रसिंह अलग हा गेन बिटकॉईन एमएलएम मार्केटिंगमध्ये होता़ त्याने गेन बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवून लोकांचा विश्वास संपादन केला व गेन बिटकॉईन या कंपनीला गुंतवणूकदार मिळवून दिले होते़ पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस शिपाई राजकुमार जाबा, शाहरुख शेख आदींनी सुरेंद्रसिंहला दिल्लीतून अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल जप्त केला असून त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असताना त्याला २९ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली.

Web Title:  Another person arrested in Delhi on the case of bitcoin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.