बारामती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दोन जणांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 10:03 PM2018-10-16T22:03:14+5:302018-10-16T22:03:37+5:30

शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघा जणांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली

Anti-Corruption Prevention Division has taken action against two people In Baramati, | बारामती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दोन जणांवर कारवाई 

बारामती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दोन जणांवर कारवाई 

Next
ठळक मुद्देयामध्ये पोलिसासह वकिलाचा समावेश :पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती : शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघा जणांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली. यामध्ये पोलिसासह वकिलाचा समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी आरोपी पांडुरंग रंगनाथ गोरवे (वय ३५, पोलीस नाईक, बारामती शहर पोलीस स्टेशन), सचिन बलभीम सोनटक्के (व्यवसाय वकील, रा. जंक्शन, ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सोनटक्के यास अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार , तक्रार देणाऱ्या युवकाच्या चुलत्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करणे, तसेच या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न न करण्यासाठी आरोपी गोरवे यांनी तक्रारदार युवकाकडे १२ हजार रुपयांची मागणी के ली होती. यासंदर्भात, आरोपी सोनटक्के यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते. त्यानुसार तक्र ारदार आरोपी सोनटक्के यांना भेटले. त्यांनी गोरवे यांच्यासाठी १२ हजार रुपये रकमेची मागणी करून ती रक्कम स्वीकारली, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या विभागाचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी या विभागाच्या पोलीस निरीक्षक अर्चना बोधडे तपास करीत आहेत. 

Web Title: Anti-Corruption Prevention Division has taken action against two people In Baramati,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.