मध्य रेल्वे मुंबई विभागातील अँटी टाउट स्क्वॉडची दलालांवर कडक कारवाई; ७.२२ लाखांची ४७५ ई-तिकिटे जप्त  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 09:43 PM2021-09-13T21:43:53+5:302021-09-13T21:45:15+5:30

Crime News : जानेवारी २०२१ ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत सखोल तपासणी आणि विशेष ऑपरेशन दरम्यान, एटीएस टीमने १९ दलालांना अटक केली आहे.

Anti-Tout Squad of Central Railway Mumbai Division cracks down on brokers; 475 e-tickets worth Rs 7.22 lakh seized | मध्य रेल्वे मुंबई विभागातील अँटी टाउट स्क्वॉडची दलालांवर कडक कारवाई; ७.२२ लाखांची ४७५ ई-तिकिटे जप्त  

मध्य रेल्वे मुंबई विभागातील अँटी टाउट स्क्वॉडची दलालांवर कडक कारवाई; ७.२२ लाखांची ४७५ ई-तिकिटे जप्त  

googlenewsNext

डोंबिवली -सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेने तिकिटांच्या काळ्या बाजारावर मोठी कारवाई केली आहे. बोनाफाईड प्रवाशांना आरक्षित तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या सततच्या प्रयत्नांमध्ये, अँटी टाउट स्क्वॉड (एटीएस), वाणिज्यिक शाखा मुंबई विभाग यांनी आरपीएफच्या मदतीने अनधिकृत तिकीट विक्रेत्यांविरोधात सखोल तपासणी मोहीम राबवली. जानेवारी २०२१ ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत सखोल तपासणी आणि विशेष ऑपरेशन दरम्यान, एटीएस टीमने १९ दलालांना अटक केली आहे आणि ७.२२ लाख रुपयांची ४७५ ई-तिकिटे जप्त केली आहेत.  

अलीकडेच १०.९.२०२१ रोजी एटीएस टीम, मुंबई विभागाने आरपीएफसह संयुक्तपणे केलेल्या तपासणीत मुंबईच्या पायधुणी  परिसरातील नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथे छापा टाकला आणि बेकायदेशीर ई-तिकिटिंग क्रियाकलाप खरेदी व्यवसायात सहभागी असलेल्या २ जणांना अटक केली.  दोघांनीही त्यांचा बेकायदेशीर सहभाग स्वीकारला. दोन्ही व्यक्तींना २ डेस्कटॉप आणि मोबाईल, ३,०४,५५० रुपये किंमतीच्या १२२ ई-तिकिटांसह  पकडण्यात आले.  त्यांना आरपीएफ पोस्ट कुर्ला येथे आणण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध कलम १४३ अंतर्गत सीआर क्रमांक ४५७/२०२१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.  

२५.४.२०२१ रोजी वडाळा (पूर्व), मुंबई येथे असेच ऑपरेशन करण्यात आले आणि RPF/दादरच्या मदतीने ५७,७०० रुपयांची ३६ ई-तिकिटे जप्त करण्यात आली.  मुख्य दक्षता निरीक्षक आणि आरपीएफ कुर्ला यांच्या दुसर्‍या संयुक्त कारवाईमध्ये, भाईंदर येथे १,११,१७५ रुपयांची १५१ ई-तिकिटे जप्त करण्यात आली.  पुढील सर्व कार्यवाहीसाठी वरील सर्व गोष्टी रेल्वे संरक्षण दलाकडे सोपवण्यात आल्या. मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आणि अधिकृत एजंट किंवा संगणकीकृत आरक्षण केंद्राकडून त्यांची तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन करते. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी www.irctc.co.in वेबसाइटवर ऑनलाईन बुक करावे.
 

Web Title: Anti-Tout Squad of Central Railway Mumbai Division cracks down on brokers; 475 e-tickets worth Rs 7.22 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.