पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या ‘त्या’ प्राध्यापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:03 PM2021-03-08T14:03:28+5:302021-03-08T14:04:14+5:30
Anticipatory Bail Rejected : . सरकारतर्फे ॲड.मोहन देशपांडे तर मुळ फिर्यादीतर्फे ॲड.कुणाल पवार यांनी बाजू मांडली.याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव : प्राध्यापक असल्याचे खोटे सांगून लग्न करुन तरुणीची फसवणूक केली, त्याशिवाय पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पियुष हरीदास बावस्कर (रा.औरंगाबाद ) याचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. त्याची आई वासंती हरीदास बावस्कर, सासरे हरीदास खंडू बावस्कर व काका शंकर खंडू बावस्कर यांचा अर्ज मंजूर झाला आहे. न्या.डी.ए.देशपांडे यांच्या न्यायालयात चौघांचा अर्ज दाखल झाला होता. सरकारतर्फे ॲड.मोहन देशपांडे तर मुळ फिर्यादीतर्फे ॲड.कुणाल पवार यांनी बाजू मांडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आधी एकीशी साखरपुडा, दुसरीशी तोतयेगिरी करुन तिसरीशी संसार थाटून तिच्या जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या पियुष हरिदास बावस्कर या तोतया प्राध्यापकासह त्याचे वडील हरिदास खंडू बावस्कर, सासु वासंती बावस्कर व चुलत सासरे शंकर खंडू बावस्कर (सर्व रा.संभाजी कॉलनी, औरंगाबाद) यांच्याविरुध्द गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मनिषा (वय २५,काल्पनिक नाव) हीचे औरंगाबाद येथील पियुष हरिदास बावस्कर याच्याशी ९ जानेवारी रोजी सरदार वल्लभभाई पटेल (लेवा भवन) येथे विवाह झाला होता.विवाहाच्या पूर्वी लग्न जुळविणाऱ्या लोकांनी तसेच पियुषच्या कुटुंबियांनी तो श्री साई पॉलीटेक्नीक कॉलेज ऑफ इंजिनियरींग औरंगाबाद या संस्थेत कायम स्वरुपी प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे व त्याला कसलेही व्यसन नाही असे सांगितले होते.लग्न झाल्यानंतर मनिषा सासरी गेली असता दोन दिवसानंतर पती दारु पिऊन आला व अश्लिल भाषेत शिवीगाळ करु लागला. यानंतर रोजच हा प्रकार सुरु असताना काही इतर महिला व मुलींशी त्याचे संबंध असल्याचे जाणवले, मोबाईलमध्ये रेकॉर्डींग तसेच व्हाटसअॅप झालेला संवाद दिसून आली. हा प्रकार सासु-सासऱ्यांना सांगितला असता त्यांनी मदत करण्याऐवजी धमकीच दिली. हा प्रकार वाढतच गेला. मद्याच्या नशेत पतीकडून जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य होत असल्याने पत्नीने हा प्रकार फोन करुन आई, वडीलांना सांगून घ्यायला औरंगाबाद येथे बोलावून घेतले. माहेरी येतान अंगावरील दागिनेही जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.