तुझ्यासाठी कायपण! परदेशी गर्लफ्रेंडशी लग्न करण्यासाठी प्रियकराने लपूनछपून गाठले शिमला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 04:28 PM2020-05-07T16:28:09+5:302020-05-07T16:30:32+5:30
महिला आणि तिचा कुल्लूच्या निर्मंड भागातील राहणारा मित्र बुधवारी शिमला येथे दाखल झाले होते.
लॉकडाऊनदरम्यान हिमाचलच्या शिमला जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी एका रशियन महिलेला तिच्या भारतीय प्रियकरासोबत पकडले. शिमलाचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ओमपती जम्वाल यांनी सांगितले की, महिला आणि तिचा कुल्लूच्या निर्मंड भागातील राहणारा मित्र बुधवारी शिमला येथे दाखल झाले होते.
200 रुपये दिले नाही म्हणून डोक्यात हातोडा हाणून केली हत्या
विकृतीचा कळस! सरबतमध्ये साखर अधिक झाल्याने बहीण - भावाची हत्या
पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे दोघे नोएडाहून कर्फ्यू पासशिवाय ट्रकच्या मागे लपून येत होते आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोघांचे लग्न करण्याचा विचार होता. महिला 30 वर्षांची आहे, तर तरुण 20 वर्षांचा आहे. याप्रकरणी ट्रक चालक आणि क्लीनर यांनाही अटक करण्यात आली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर (एफआयआर) नोंदविण्यात आला आहे. धौलीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये रशियन महिलेला आणि शोगीमधील तीन पुरुषांना अलग ठेवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
देशात लॉकडाऊन असल्याने लोकांना आजूबाजूला फिरण्याची परवानगी नाही. महत्वाच्या कामास जाण्यासाठी प्रशासनाकडून कर्फ्यू पास आवश्यक आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार सुरू आहे, या साथीच्या आजारामुळे आत्तापर्यंत कोट्यवधी लोक मरण पावले आहेत.