कोपरगावमध्ये अॅपे-कंटेनरचा भीषण अपघात; ६ ठार, ७ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 01:49 PM2022-05-06T13:49:59+5:302022-05-06T13:55:29+5:30
अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग (वय ४२ रा दानामंडी लुधियाना पंजाब) हा नाशिकच्या दिशेने फरार झाला. मात्र स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील मुंबई - नागपूर महामार्गावर चांदेकसारे येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अॅपे आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. कंटेनरने (- पी बी ०५ एबी ४००६) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला कट मारून प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षाला ( एम. एच.१७ ए. जे. ९०५६) जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच रिक्षातील प्रवाशांसह संबंधित मोटारसायकलवरील तीन जण, असे एकूण ७ जण जखमी झाले आहेत. जखमीवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे अशी -
१) राजाबाई साहेबराव खरात (वय ६० वर्षे रा. चांदेकसारे)
२) आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय ६५ वर्षे रा. वावी,)
३) पुजा नानासाहेब गायकवाड (वय २० वर्षे रा. हिंगणवेढे)
४) प्रगती मधुकर होन (वय २० वर्षे रा. चांदेकसारे)
५) शैला शिवाजी खरात (वय ४२ वर्षे रा.श्रीरामपूर)
६) शिवाजी मारुती खरात (वय ५२ रा. श्रीरामपूर)
या अपघातात जखमी झालेल्यांमुध्ये विलास साहेबराव खरात (वय ३४ वर्षे रा. चांदेकसारे), कावेरी विलास खरात (वय ५ वर्षे रा. चांदेकसारे), रुपाली सागर राठोड (वय ४० वर्षे रा. सिन्नर), धृव सागर राठोड (वय १७ रा. सिन्नर) यांचा समावेश आहे. तर मोटार सायकलवरील दिगंबर चौधरी व त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी (वय १२ वर्षे), बहीण कृष्णाबाई गोविंद चौधरी (वय ४२ वर्षे ) सर्व राहणार पोहेगाव, हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर एस.जे.एस. रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग (वय ४२ रा दानामंडी लुधियाना पंजाब) हा नाशिकच्या दिशेने फरार झाला. मात्र स्थानिक नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी माजी उपसरपंच केशवराव होन, डाऊचचे सरपंच संजय गुरसळ, शंकर गुरसळ, सुधाकर होन, कांतीलाल सोळसे, सिद्धार्थ सोळसे, आदिसह स्थानिक नागरिकांनी विशेष प्रयत्न केले.