सायबर गुन्ह्यांना तुम्ही बळी पडताय का?, मग हे वाचायलाच हवं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 12:19 PM2023-09-10T12:19:07+5:302023-09-10T12:19:29+5:30

आपण विचारही करू शकत नाही, इतक्या वेगाने तंत्रज्ञान अपडेट होत आहे. त्यासोबतच गुन्हे करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत...

Are you a victim of cyber crime?, then this is a must read | सायबर गुन्ह्यांना तुम्ही बळी पडताय का?, मग हे वाचायलाच हवं

सायबर गुन्ह्यांना तुम्ही बळी पडताय का?, मग हे वाचायलाच हवं

googlenewsNext

एड. प्रशांत माळी, सायबर तज्ज्ञ

आपल्याला नवनवीन तंत्रज्ञान हवे असतात, परंतु ते हाताळण्याच्या काही नैतिक जबाबदाऱ्या नको असतात. जसे स्मार्ट फोनच्या या युगात सगळ्यांना एका क्लिकवर सगळे हवे असते, त्याप्रमाणेच गुन्हेदेखील एका क्लिकवर घडताना आपल्याला दिसतात. तुमचा असा समाज असेल की, गुन्हे हे फक्त प्रौढ लोकांसोबतच घडतात. तर हा तुमचा भ्रम आहे.    

सायबर गुन्हे हे लहान बालकांपासून ते वयोवृद्ध लोकांसोबत घडताना आपल्याला आढळतात. सायबर गुन्हे हे का घडतात याचे सोपे उत्तर आहे. जसे गुन्हेगार सायबर गुन्हे करण्याच्या नवनवीन पद्धती शोधून काढतात, त्याप्रमाणे तंत्रज्ञान वापरणारे हे त्याचे नियम पाळत नाहीत. स्वतःला तंत्रज्ञानासोबत अपडेट करीत नाहीत आणि गुन्ह्यांची सुरुवात ही तेथूनच होताना आपल्याला दिसते. जेव्हा आपण आधुनिक तंत्रज्ञान असलेला मोबाइल किंवा कोणतेही आधुनिक गॅझेट किंवा आपले ३ जी इंटरनेट हे ४ जी मध्ये रूपांतरित करतो तेव्हा ते कसे वापरायचे हे विचारून घेतो. परंतु ते सुरक्षित कसे वापरायचे, हे मात्र विचारत नाही. सायबर गुन्हे करण्यामध्ये सोशल मीडियाचादेखील खारीचा वाटा आहे. अशा विविध सायबर गुन्ह्यांबद्दल आपण सखोलपणे माहिती पुढील लेखात जाणून घ्यालच.

nसायबर आतंकवाद हा एक सायबर हल्ला आहे, ज्यामध्ये हॅकर्स सरकार किंवा इतर महत्त्वपूर्ण संस्थांना लक्ष्य करतात. ते या हल्ल्यांद्वारे सरकारची महत्त्वपूर्ण व गोपनीय अशी माहिती चोरी करू शकतात, अवरोधन करू शकतात किंवा प्रणाली नष्ट करू शकतात. अश्लील साहित्य (Pornography) हा एक सायबर गुन्हा आहे, ज्यामध्ये अश्लील साहित्याचा प्रसार केला जातो. हे साहित्य मुलांना किंवा इतर असुरक्षित व्यक्तींना पाठविले जाऊ शकते. यामध्ये लहान मुलांचे अश्लील साहित्यदेखील मोठ्या प्रमाणात पसरविले जाते. 

nसॉफ्टवेअर पायरेसी हा एक सायबर गुन्हा आहे, ज्यामध्ये सॉफ्टवेअरची अवैध कॉपी केली जाते. यामुळे सॉफ्टवेअर कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान होते. व्हायरस पसरविणे हा एक सायबर गुन्हा आहे, ज्यामध्ये हॅकर्स व्हायरस किंवा मालवेयर पसरतात. या व्हायरस किंवा मालवेयरमुळे संगणकाची प्रणाली खराब होऊ शकते किंवा डेटा नष्ट होऊ शकतो.

nसायबर गुन्ह्यांत हॅकिंग, फिशिंग, डेटा चोरी, सीम कार्ड एक्स्चेंज फ़्रॉड, स्पॅमिंग, ऑनलाइन जुगार, सॉफ्टवेअर पायरसी, क्रेडिट कार्ड फ्रॉड, सायबर आतंकवाद, पोर्नोग्राफी, रिवेंज पॉर्न, ई-मेल फ्रॉड इ.चा समावेश होतो.

nसायबर गुन्ह्यांत हॅकिंग, फिशिंग, डेटा चोरी, सीम कार्ड एक्स्चेंज फ़्रॉड, स्पॅमिंग, ऑनलाइन जुगार, सॉफ्टवेअर पायरसी, क्रेडिट कार्ड फ्रॉड, सायबर आतंकवाद, पोर्नोग्राफी, रिवेंज पॉर्न, ई-मेल फ्रॉड इ.चा समावेश होतो.

वित्तीय फसवणूक : सायबर गुन्हेगार आपल्या आर्थिक माहितीचा गैरवापर करून पैसे चोरण्याचा प्रयत्न करू शकतात. ते एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा ऑनलाइन खरेदी करण्यासाठी आपले क्रेडिट कार्ड तपशील वापरू शकतात. 

हॅकिंग : हॅकिंग हा एक सायबर हल्ला आहे, ज्यामध्ये हॅकर्स आपल्या संगणकावर किंवा नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवितात. ते आपला डेटा हॅक करू शकतात, आपल्या फायली नष्ट करू शकतात किंवा आपल्या संगणकाचा ताबा घेऊ शकतात. 

डेटा चोरी : सायबर गुन्हेगार आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकतात. ही माहिती त्यांना फिशिंग ई-मेल किंवा स्पॅम संदेशाद्वारे मिळू शकते. 

Web Title: Are you a victim of cyber crime?, then this is a must read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.