कुत्रा अंगावर सोडण्याचा वाद विकोपाला; भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 10:34 AM2020-06-07T10:34:25+5:302020-06-07T10:34:51+5:30
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध मारामारी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पुणे - कुत्रा अंगावर सोडतोस काय यावरुन ज्येष्ठ नागरिकाबरोबर झालेल्या वादात आरडाओरडा ऐकून दारु पिणार्या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. त्यात त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. कोथरुडमधील सहजानंतद सोसायटीच्या रोडवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध मारामारी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अमर सयाजी बनसोडे (वय २६), विनोद सुरेश गंदे (वय २६ दोघे रा. गणंजय सोसायटी, श्रावणधारा वसाहत, कोथरुड), तेजस कांबळे, मिथून हरगुडे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका महिलेने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे सासरे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कुत्र्याच्या घेऊन बाहेर फिरायला जात होते. त्यावेळी सहजानंद सोसायटीच्या बाहेर जवळच्या सोसायटीतील अमर बनसोडे, विनोद गंदे व त्यांचे दोन मित्र हे तेथे दारू पित थांबले होते. त्यांच्या अंगावर कुत्रा भुंकल्याने त्यांनी कुत्रा अंगावर सोडतो काय या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी हे चौघे चारचाकी गाडीतून त्यांच्या मागोमाग आले. त्यांनी शिवीगाळ करुन त्यांना मारण्यासाठी काचेची बाटली व दगड फेकून मारला. त्यामुळे फिर्यादीचे सासरे हे घाबरुन जोरात आरडाओरडा करीत सोसायटीत पळाले. त्यांचा आवाज ऐकून राहुल कोल्हे, विलास कोल्हे हे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही या चौघांनी मारहाण केली. तेव्हा त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी तेथे आल्या. तेव्हा त्यांच्यातील एकाने फिर्यादी यांच्या दंडाला धरुन ढकलून दिले.
हा आरडाओरडा ऐकून माजी आमदार मेधा कुलकर्णी याही तेथे पोहचल्या. सोसायटीतील इतर लोक जमले. तेव्हा या चौघांनी सर्वांना धक्काबुक्की करीत हाताने मारहाण करुन तुमचा मुडदा पाडण्याची व बघून घेण्याची धमकी दिली. या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने दारुची दुकाने उघडली़ पण त्याचवेळी बार बंद असल्याने गाड्यांमध्ये बसून, रस्त्यावर दारु पिण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून छोट्या मोठ्या मारामारीच्या घटना वाढल्या आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
१३ तास, ८ हॉस्पिटल अन् आठ महिन्याची गरोदर महिला; निर्दयी यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा बळी
सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा
...तर खुलासा लवकरच होईल; अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप
जाणून घ्या, एटीएम मशीनला हात न लावता अवघ्या २५ सेकंदात ग्राहकांना पैसे काढता येणार!