उसण्या पैशांवरुन वाद, पीएमपी चालकाचा खून, दोघा मित्रांना अटक!
By विवेक भुसे | Published: September 16, 2023 10:37 AM2023-09-16T10:37:18+5:302023-09-16T10:37:34+5:30
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमनाथ अशोक कुंभार (वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय २०, रा. धनकवडी) या दोघांना अटक केली आहे.
पुणे : दारु पित बसले असताना उसने दिलेल्या पैशाच्या वादातून दोघा मित्रांनी पीएमपी चालकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला. राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६, रा. जांभुळवाडी) असे खून झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमनाथ अशोक कुंभार (वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय २०, रा. धनकवडी) या दोघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिवेकर व आरोपी हे दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात उसने दिलेल्या पैशांवरुन वाद झाला. त्यात दोघांनी धारदार शस्त्राने दिवेकर यांचा खून केला. पती रात्रभर घरी न आल्याने त्यांची पत्नी पहाटे त्यांचा शोध घेत होती. त्यावेळी त्यांना दिवेकर यांचा खून झाल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.