अरमान कोहलीच्या एनसीबी कोठडीत १ सप्टेंबरपर्यंत वाढ; घरात आढळलेले एक ग्रॅमपेक्षा अधिक कोकेन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 07:17 AM2021-08-31T07:17:28+5:302021-08-31T07:17:57+5:30
अटकेनंतर त्यांना विशेष एनडीपीएस न्यायालयात हजर करण्यात आले व न्यायालयाने त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली.
मुंबई : विशेष एनडीपीएस न्यायालयाने अभिनेता अरमान कोहली व ड्रग विक्रेता अजय सिंग यांच्या एनसीबी कोठडीत १ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) २८ ऑगस्ट रोजी अरमान कोहली व अजय सिंग याला अटक केली. अटकेनंतर त्यांना विशेष एनडीपीएस न्यायालयात हजर करण्यात आले व न्यायालयाने त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली.
दोघांच्याही एनसीबी कोठडीत वाढ करण्यात यावी, यासाठी एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, कोहलीच्या घरावर छापा मारला असता त्याच्या घरात एक ग्रॅमपेक्षा अधिक कोकेन आढळले. त्यामुळे चौकशीसाठी दोघांचाही ताबा हवा आहे.एनसीबीच्या म्हणण्यानुसार, सिंग हा ड्रग्ज विक्रेता आहे. त्यानेच या प्रकरणात कोहलीचाही समावेश असल्याचे पोलिसांना सांगितले.