रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयावर सशस्त्र हल्ला; डॉक्टरांनाही मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 09:03 AM2020-10-28T09:03:16+5:302020-10-28T09:16:17+5:30

पालिका रुग्णालयातील प्रकार : रुग्ण दगावल्याने पहाटे तीन वाजता घडली घटना 

Armed attack on hospital by angry relatives over patient betrayal; Beating doctors too | रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयावर सशस्त्र हल्ला; डॉक्टरांनाही मारहाण

रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयावर सशस्त्र हल्ला; डॉक्टरांनाही मारहाण

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी पालिका रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी सशस्त्र रुग्णालयात घुसून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

मंगळवारी दुपारी जुहूगाव येथील 48 वर्षीय व्यक्तीला अत्यवस्थ अवस्थेत वाशीतील पालिका रुग्णालयात नॉन कोविड विभागात दाखल केले होते. त्यापूर्वी रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावत चालल्याने पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु मंगळवारी मध्यरात्री या व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.  हि माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना कळवताच त्यांनी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयावर हल्ला केला. सुरक्षारक्षक, परिचारिका यासह डॉक्टरांना मारहाण करत त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी काहींच्या हातात धारदार शस्त्रे होती असेही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या हल्ल्यात  रुग्णालयाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन काहींना ताब्यात घेतले आहे. याचे पडसाद बुधवारी सकाळी रुग्णालयाच्या कामकाजावर उमटले. रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यापूर्वी देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सतत घडत असलेल्या अशा घटनांचा निषेध पालिका रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून होत आहे. 

Web Title: Armed attack on hospital by angry relatives over patient betrayal; Beating doctors too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.