लसीकरण पथक असल्याचा बनाव करीत अकोटात भरदिवसा सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 04:57 PM2021-08-31T16:57:24+5:302021-08-31T17:40:00+5:30
Armed robbery in Akot : दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करुन तोडांत बोळे कोंबून दोराने एका खालीत बांधून ठेवले होते.
- विजय शिंदे
अकोटः कोरोनाची लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करीत अकोट शहरात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना ३१आँगस्ट घडली. या दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करुन तोडांत बोळे कोंबून दोराने एका खालीत बांधून ठेवले होते. या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शहरातील प्रचंड रहदारी असलेल्या जवाहररोड लगत बुधवार वेस परिसरात प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल हे आपल्या कुंटबासह वरचे माळ्यावर राहतात. त्यांच्या घरी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० ते ३ वाजता दरम्यान काही महिला व पुरुष आले. त्यांनी दरवाजा वाजवून कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचे बनाव केला. यावेळी दरवाजा वरच सेजपाल यांच्या नात देलिशा हिला मी विद्यार्थी असल्याने लस घेतली नाही सांगितले. त्यामुळे या बनावट पथकाने घरात कोणकोण आहे अशी विचारणा करताच देलिशा हिला शंका आल्याने तीने ओळखपत्र मागितले असता या दरोडेखोर टोळीतील एका महिलेने दरवाजा जोरात लोटत घरात घुसले. घरातील वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल,त्यांची पत्नी इंदुबहन सेजपाल, नात देलिशा यांना मारहाण करीत तोडांत बोळे कोबंत चिकटपट्या लावल्या.तसेच
दोरीने बांधून एका खोलीत कोंडून ठेवले. अमृतलाल सेजपाल यांना सशस्त्र मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर घरातील सामान फेकफाक करीत कपाट फोडली.
दरम्यान दुसरीकडे एका खोलीत बंद असलेल्या आबा-आजी व नातीने कशीतरी तोडांचे बोळ काढून खिडकीतून आरडाओरडा केली असता आजुबाजूचे शेजारी धावत आले.तोपर्यत दरोडेखोरांनी बाहेरून घराचा दरवाजा बंद करुन पळून गेले होते. दरम्यान शेजारच्या लोकांनी दरवाजा उघडून या तिघांची सुटका केली. तिघेही खुपच घाबरले होते. यावेळी अमृतलाल सेजपाल जखमी असल्याने त्यांच्यावर घरीच डॉ. विशाल इंगोले यांनी उपचार केले.
विशेष म्हणजे हा परिसर खुपच गजबजलेला असुन बाजारपेठ आहे. तर अमृतलाल सेजपाल यांचा मुलगा यश्वीन, सुन भावना व लहान नातु शौर्य हे बाहेरगावी खामगाव गेले होते. दरोडेखोरांनी तीचे जवळचा एक मोबाईल लंपास केला आहे. दरोडेखोरांनी घरातील किती रुपयांचा ऐवज लंपास केला याबाबतची चौकशी सुरु आहे. माहीती मिळताच घटनास्थळावर शहर पोलीस निरिक्षक प्रकाश अहिरे यांनी पोलीस पथकासह धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर डिबी स्काँडसह पोलीस कर्मचारी विविध दिशेने पाठवले. घटनास्थळी डाँग स्काँड बोलावण्यात आले आहे.