खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर १२ लाखाने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 05:23 PM2021-06-15T17:23:31+5:302021-06-15T17:23:39+5:30

Crime News : मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५  जून रोजी सकाळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून बंदुकीच्या धाकावर १२ लाख रुपये लंपास केले.

Armed robbery at a private agricultural produce market committee; 12 lakhs looted at gunpoint | खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर १२ लाखाने लुटले

खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या धाकावर १२ लाखाने लुटले

Next

मालेगाव ( वाशिम)  : मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५  जून रोजी सकाळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून बंदुकीच्या धाकावर १२ लाख रुपये लंपास केले.
शहरातील आशिष मुंदडा यांनी फिर्याद दिली की, मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या नागपूर ते मुंबई या राज्य महामार्गावरील ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजारवर १४ जून रोजी सकाळी साडेचार वाजता चे दरम्यान सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश करून बिहार येथील रोशन कुमार परमानंद ठाकूर या हमाल कर्मचाऱ्यावर बंदूक रोखून दरोडा टाकला. ना.ना. मुंदडा ही खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मागील पाच वर्षांपासून कार्यान्वित आहे. १५ जून रोजी सकाळी साडेचार वाजता चे दरम्यान दोन सुरक्षा रक्षक हे आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान कार्यालयाच्या बाजूला झोपलेल्या एका बिहार राज्यातील हमाल कर्मचारी याच्या छातीवर पाय ठेवून बंदुकीचा धाक दाखविला व दोन कार्यालयाचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि आतील कॅबिन तोडून २ ऑफिसच्या ड्राव्हरमधील जवळपास १२ लाख ५६ हजार रुपय असलेली रक्कम लुटून नेली आणि तिथे असलेला सीसीटीव्ही घेऊन गेले. घटनास्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भेट दिली. श्वान पतकलासुद्धा पाचरारण केले होते. परंतु तेथील एका कर्मचाऱ्याच्या खोलीपर्यंत गेल्यानंतर श्वान हा रस्त्यावर येऊन शांत बसला. पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

Web Title: Armed robbery at a private agricultural produce market committee; 12 lakhs looted at gunpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.