अर्णब गोस्वामीचं Whatsapp चॅट प्रशांत भूषण यांनी केलं ट्वीट अन् म्हटले जेलमध्ये जाण्यासाठी हा पुरावा पुरेसा
By पूनम अपराज | Published: January 15, 2021 04:51 PM2021-01-15T16:51:53+5:302021-01-15T16:52:45+5:30
Arnab Goswami's Chat viral regarding TRP Scam : प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून कथित WhatsApp चॅट शेअर केले आहे.
बहुचर्चित वकील प्रशांत भूषण यांनी खळबळजनक दावा केला आहे की, रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे एक कथित whatsApp चॅट पसरले आहे. प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून कथित WhatsApp चॅट शेअर केले आहे. त्याच्या मते, हे चॅट अर्णब गोस्वामी आणि रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ यांच्यामधील झालेली बातचीत आहे.
These are a few snapshots of the damning leaked WhatsApp chats between BARC CEO & #ArnabGoswami. They show many conspiracies&unprecedented access to power in this govt; gross abuse of his media&his position as power broker. In any Rule of law country, he would be in jail for long pic.twitter.com/6aGOR6BRQJ
— Prashant Bhushan (@pbhushan1) January 15, 2021
प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलचे स्क्रीनशॉट शेअर करत असे लिहिले आहे की, हे बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यात झालेल्या चॅटचे पसरलेले फोटो आहेत. या फोटोंवरून गोस्वामी यांच्या काटकारस्थानाचा पोल खोल होते. प्रशांत भूषण यांनी पुढे असे लिहिले आहे की, याबरोबर असंही उघड होतं , कशाप्रकारे मीडिया आणि आपल्या पदाचा गैरवापर केला गेला आहे. कायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे सीईओ यांच्यातील WhatsApp चॅट लीक झालेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ट्विटर युजर्स अर्णब गोस्वामी हॅशटॅगसह कथित चॅट शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत. प्रशांत भूषण यांच्या याच ट्वीटवर कमेंट करताना पत्रकार मीना दास नारायण यांनी लिहिले आहे की, आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू ? एक कारण सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू. प्रशांत भूषण यांच्या या ट्वीटवर परवेज खान या युजरने या ब्रेकींग न्यूजला कोणतंही मीडिया हाऊस का कव्हर करत नाहीय असा प्रश्न उपस्थित केला आहे.