Arnab Goswami : अर्णब गाेस्वामी यांनी जामीन अर्ज घेतला मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 03:08 PM2020-11-05T15:08:02+5:302020-11-05T15:12:03+5:30
Arnab Goswami : मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी गाेस्वामी यांच्या वकीलांनी मुळात पाेलिसांनी दाखल केलेला एफआयआर चुकीचाच आहे, असा अर्ज दाखल केला आहे.
आविष्कार देसाई
रायगड - रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गाेस्वामी यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती वकील डाॅ. निहा राऊत यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबागच्या न्यायालायाने बुधवारी अर्णव गाेस्वामी यांची 14 दिवसांकरीता न्यायालयीन काेठडीत रवानगी केली हाेती. त्यानंतर तातडीने तिन्ही आराेपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला हाेता. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी गाेस्वामी यांच्या वकीलांनी मुळात पाेलिसांनी दाखल केलेला एफआयआर चुकीचाच आहे, असा अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर दुपारी तीन वाजता सुनावणी हाेणार आहे. याच कारणासाठी गाेस्वामी यांनी अलिबाग न्यायालयात दाखल केलेला जामिन अर्ज मागे घेतला आहे, असे वकील डाॅ. निहा राऊत यांनी स्पष्ट केले.
Arnab Goswami : अर्णब गोस्वामी यांनी बुधवारी रात्री अलिबागमध्ये कुठे मुक्काम केला?
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेने बुधवार सकाळपासून गोंधळाचे वातावरण निर्माण केले. पाेलिसांशी दीड तास हुज्जत घातल्यानंतर गोस्वामी यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून अलिबागला नेण्यात आले. या वेळी सरकार आणि पोलिसांवर टीका करत वाहनातूनही ‘पूछता है भारत’चा त्यांचा नारा सुरू होता.
सकाळी पाच वाजता मुंबई गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे पथक आणि रायगड पोलीस गोस्वामी यांच्या वरळी येथील घरी धडकले. सुरुवातीला बराच वेळ पोलिसांना दारातच ताटकळत ठेवण्यात आले. वकिलांशी बोलल्यानंतर गोस्वामी यांनी पथकाला आत येऊ दिले. पुढे पोलिसांनी रीतसर सर्व कागदपत्रे, यापूर्वी दिलेल्या नोटीस त्यांना दाखवून सोबत येण्यास सांगितले. मात्र गोस्वामी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे व्हिडीओ शूटिंग सुरू केले. या वेळी जवळपास दीड तास पाेलिसांशी हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना हात धरून बाहेर नेण्यास सुरुवात करताच, गोस्वामी यांनी तब्येत बरी नसल्याचे सांगितले. त्यातही टीव्हीवर लाइव्ह अपडेट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांना घरातून बाहेर काढत पोलीस वाहनात बसविले. वाहनातूनही सरकार आणि पोलिसांवर त्यांचे टीका करणे सुरू होते. आठच्या सुमारास एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत त्यांना अलिबागला नेण्यात आले होते.
अर्णब गाेस्वामी, नितेश सारडा आणि फिराेज शेख यांना मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती. त्याला आव्हान देणारा अर्ज रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आज दाखल केला आहे. त्या अर्जावर शनिवारी सुनावणी हाेणार- जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी