महिलेवर बलात्कार करून तिच्या मुलांना कोंडून ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 05:02 PM2019-05-20T17:02:01+5:302019-05-20T17:03:34+5:30
पोलीस अधिकार्याला निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई - घरकाम करणार्या ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला आणि तिच्या दोन मुलांना कोंडून ठेवणार्या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या या पोलीस अधिकार्याला विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा खळबळजनक प्रकार शनिवारी रात्री विक्रोळी कन्नमवार नगर येथे घडला असून अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्याला निलंबित करण्यात आले आहे. प्रफुल्ल आगवणे (४६) असं अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्याचे नाव असून तो कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे.
विक्रोळी परिसरातील कन्नमवार नगर येथे राहणार्या आगवने यांच्या घरी गेल्या एका वर्षांपासून ३१ वर्षीय महिला ही घरकाम करण्यासाठी येत होती. शनिवारी पीडित महिला आपल्या दोन मुलांसह पोलीस उपनिरीक्षक आगवणे याच्या घरी घरकाम करण्यासाठी आली होती. दरम्यान आगवणे हा तिला एका एका खोलीत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. विक्रोळी पोलिसांनी कोंडून ठेवलेल्या पीडित महिलेची आणि मुलांची सुखरूप सुटका केली आहे.