शेतकऱ्यांची जमीन बालकावणाऱ्या पुरोहित बिल्डरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 09:38 PM2019-01-07T21:38:05+5:302019-01-07T21:39:20+5:30

जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या किसन पुरोहित या बिल्डरला मीरारोड पोलीसांनी अटक केली आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

The arrest of the priest-builder of the land of farmers was arrested | शेतकऱ्यांची जमीन बालकावणाऱ्या पुरोहित बिल्डरला अटक

शेतकऱ्यांची जमीन बालकावणाऱ्या पुरोहित बिल्डरला अटक

Next
ठळक मुद्देजमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या किसन पुरोहित या बिल्डरला मीरारोड पोलीसांनी अटक केली आहे. हेमप्रकाश यांनी सदर वचनचिठ्ठी बनावट असून त्यातील सह्या देखील खोट्या असल्याचे सांगत तशी तक्रार केली होती.

मीरारोड - शेतकऱ्यांनी आपल्याला जागा विक्री करायचे निश्चित केल्याची बनावट वचनचिठ्ठी बनवून जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या किसन पुरोहित या बिल्डरला मीरारोड पोलीसांनी अटक केली आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

हिराजी पाटील यांच्या कुटुंबाची मीरारोडच्या कनकिया भागातील आयुक्त बंगल्यामागे सुमारे १०० गुंठे इतकी जमीन आहे. या जमीन ही इमामुद्दीन शेख याने खोट्या कागदपत्रांद्वारे बळकावण्याचा प्रयत्न केल्याने त्या विरोधात हेमप्रकाश पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन इमामुद्दीन याला अटक झाली. याच दरम्यान किसन पुरोहित याने या जमीन शेतकऱ्यांनी आपणास विकण्याचे मान्य केल्याचे सांगत हेमप्रकाश सह त्याचे अन्य दोन भाऊ, दोन बहिणी व आई यांच्या सह्या असल्याची वचनचिठ्ठी न्यायालयातील एका दाव्यात सादर केली होती. हेमप्रकाश यांनी सदर वचनचिठ्ठी बनावट असून त्यातील सह्या देखील खोट्या असल्याचे सांगत तशी तक्रार केली होती.
मीरारोड पोलीसांनी अखेर या प्रकरणी पुरोहित विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यजित कस्तुरे यांनी शुक्रवारी रात्री पुरोहित याला अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुरोहित याच्या अटकेने पुन्हा एकदा शहरातील शेतकरयांना त्यांच्या जमीनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे.

Web Title: The arrest of the priest-builder of the land of farmers was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.