टीचरला अटक करा, थेट दुसरीतल्या विद्यार्थ्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव अन् केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 04:59 PM2022-03-06T16:59:11+5:302022-03-06T17:01:06+5:30

physical punishment : अनिल नाईक असे या दुसरीत शिकणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो एका खासगी शाळेत शिकतो. या शाळेच्या परिसरात पोलीस ठाणे आहे. 

Arrest the teacher, 2nd standard student directly go to the police station and lodged a complaint | टीचरला अटक करा, थेट दुसरीतल्या विद्यार्थ्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव अन् केली तक्रार

टीचरला अटक करा, थेट दुसरीतल्या विद्यार्थ्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव अन् केली तक्रार

Next

हैदराबाद - इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने आपल्या शिक्षकाची तक्रार नोंदवण्याची विनंती पोलिसांना केली. तसेच शिक्षक अटक करा अशी देखील विनंती केली. त्याचे कारण ऐकून महिला पोलीस निरीक्षक सुद्धा सुन्न झाल्या. तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील बयाराम मंडल येथे ही घटना घडली आहे. अनिल नाईक असे या दुसरीत शिकणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो एका खासगी शाळेत शिकतो. या शाळेच्या परिसरात पोलीस ठाणे आहे. 

एक दुसरीच्या वर्गात शिकणारा मुलगा अचानक पोलीस ठाण्यात आला. त्याला एकट्याला पाहून तो हरवला असेल असं पोलिसांना वाटलं. त्यानंतर महिला पोलीस निरीक्षक रमादेवी यांनी तू इथं का आलास? असं मुलाला विचारलं. त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून रमादेवी थक्क झाल्या. मला माझ्या शिक्षकाने मारहाण केली आहे. त्यामुळे त्यांची तक्रार नोंदवायची आहे, असं त्या मुलानं सांगितलं. त्याला कारण विचारलं असता, मी अभ्यास करत नव्हतो म्हणून मारलं, असं त्या मुलानं सांगितले.

क्राइम :खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला

अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मुलाला बेड्या

पोलीस निरीक्षक रमादेवी यांनी या मुलाची तक्रार शांतपणे ऐकून घेतली. त्यानंतर त्या मुलाला घेऊन शाळेत पोहोचल्या. तिथे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी तडजोड करण्यास तयार नव्हता. त्या विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आलं. नंतर हा वाद मिटला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Arrest the teacher, 2nd standard student directly go to the police station and lodged a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.