क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 06:54 PM2019-09-02T18:54:37+5:302019-09-02T18:55:51+5:30
शमीची पत्नी हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.
पश्चिम बंगाल - भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही. क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमदविरोधात अलिपोर कोर्टाने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. १५ दिवसांचा अवधी त्याला सरेंडर होण्यास वा जामीन मिळविण्यास देण्यात आला आहे. मोहम्मद शमी सध्या वेस्ट इंडिजविरोधात दुसरी आणि अंतिम कसोटी खेळत आहे. शमीने २०१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. अलीकडेच २०१८ मध्ये मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा भा. दं. वि. कलम ४९८ - अ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
जहाँने पश्चिम बंगालच्या अलिपोर कोर्टात शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. या नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केला. हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केली होती. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी अशी १० लाखांची मागणी केली होती. केस दाखल केल्यानंतर हसीनने कोर्टात सादर झाला नसल्याचा आरोप केला. एप्रिल २०१९ मध्ये पतीच्या घरी जाऊन गोधळ घातल्याप्रकरणी हसीनला उत्तर प्रदेशातील अमरोही येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.
West Bengal: Alipore court issues arrest warrant against Indian cricketer Mohammad Shami and his brother Hasid Ahmed in connection with domestic violence case filed by his wife Hasin Jahan. The court has asked him to surrender within 15 days pic.twitter.com/0LKn8ivCOl
— ANI (@ANI) September 2, 2019
नवी दिल्ली - क्रिकेटपटू मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2019