आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ४४ दलालांना पकडले; आरपीएफ पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 02:05 AM2020-07-24T02:05:03+5:302020-07-24T02:05:08+5:30
८ लाख किमतीची तिकिटे जप्त
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेमध्ये आरक्षित तिकिटे देणाºया दलालांचे प्रमाण मोेठ्या संख्येने वाढले होते. याबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा दलाने रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी दलालांविरुद्ध मोहीम राबविली. या मोहिमेत ४४ दलाल पकडण्यात आले. त्यांच्याकडून ८ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
मध्य रेल्वेने १२ मेपासून वातानुकूलित विशेष गाड्यांच्या ३० फेºया सुरू केल्या. त्यानंतर १ जून रोजी निवडक विशेष जलद गाड्यांच्या २०० फेऱ्यांची घोषणा केली. यामध्ये अनेक वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटे काढण्यात आली असून या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी दाखल होऊ लागल्या.
दलालांविरुद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. या छाप्यांत सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले. यातून ८ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ ई-तिकिटे जप्त केली.
आरपीएफ ठरले कोरोना योद्धे
च्रेल्वे मालमत्तेचे रक्षण करणे. अडकलेल्या प्रवाशांना अन्नाच्या पाकिटांचे वितरण करणे. लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घालून देण्याचे काम, श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी,
गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय साहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे.
च्कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहकाºयांना नावीन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अंमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाइल फोन जप्त करण्याचे काम ते चोखपणे करीत आहेत.