रेल्वेत नोकरीला लावतो सांगून पैसे उकळणाऱ्यास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 09:07 PM2018-10-10T21:07:37+5:302018-10-10T21:08:00+5:30

नुकतीच त्याने नोकरीला लावतो अशी बतावणी करून एकाकडून दीड लाख रुपये उकळले होते.

arrested accuse who who cheated a man getting jobs in the railway by paying money | रेल्वेत नोकरीला लावतो सांगून पैसे उकळणाऱ्यास अटक 

रेल्वेत नोकरीला लावतो सांगून पैसे उकळणाऱ्यास अटक 

googlenewsNext

मुंबई - रेल्वेत नोकरीला लावण्याचं खोटी बतावणी करून  फरार झालेल्या एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी हनी ट्रॅपच्या मदतीने अटक केली आहे. रामर सुरलई पिल्लई असं या आरोपीचं नाव आहे. नुकतीच त्याने नोकरीला लावतो अशी बतावणी करून एकाकडून दीड लाख रुपये उकळले होते. अंधेरी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सायन परिसरात राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीच्या मुलाची शासकिय नोकरी मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. अशातच एके दिवशी काही कामानिमित्त तक्रारदार विलेपार्ले येथे आले होते. त्यावेळी रेल्वेच्या प्रवासादरम्यान रामर हा त्याच्या बाजूला बसला होता. त्यावेळी रामर हा फोनवरून एका व्यक्तीला शासकिय नोकरी मिळवून देण्याच्या गोष्टी करत असल्यानं तक्रारदार रामरच्या संपर्कात आले. त्यावेळी रामरने त्यांना तुमच्या मुलाला नक्की रेल्वेत नोकरी मिळवून देणार असल्याचं आश्वासन दिलं. मात्र त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील असे सांगून दीड लाख रुपये उकळले. मात्र पोलिसांनी हनी ट्रॅपच्या मदतीने आरोपी पिल्लईला जेरबंद केले. 

Web Title: arrested accuse who who cheated a man getting jobs in the railway by paying money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.