खंडणीखोर स्वच्छता मार्शलला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 20:29 IST2019-10-14T20:20:49+5:302019-10-14T20:29:33+5:30
2 हजार रुपये दंडाची रक्कम स्वीकारत खंडणीखोर स्वच्छता मार्शल अटकेत

खंडणीखोर स्वच्छता मार्शलला अटक
कल्याण - रस्त्यावर न थुंकता व्यक्तीकडून 2 हजार रुपये दंडाची रक्कम स्वीकारत खंडणीखोर स्वच्छता मार्शल अटकेत त्याला पावती न देणाऱ्या गणेश गोडसे आणि दीपक करांडे या दोघांना एमएफसी पोलिसांनीअटक केली आहे.
उल्हासनगर येथे राहणारे संतोष चव्हाण रविवारी कल्याणमध्ये खरेदीसाठी आले होते.एसटी आगार परिसरात चव्हाण यांना गणेश गोडसे आणि दीपक करांडे या मार्शलनी हटकले. तुम्ही रस्त्यावर थुंकला आहात, केडीएमसीच्या स्वच्छ भारत अभियानाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची मागणी केली आणि दंड न भरल्यास पोलीस कारवाई टाळायची असेल तर २ हजार रुपये दंड भरावा लागेल असे या दोघांनी चव्हाण यांना सांगितले. त्यानुसार, चव्हाण यांनी २ हजार रुपये दंड भरत पावतीची मागणी केली. एका पावतीच्या मागील बाजूस चव्हाण यांची सही घेतली. मात्र, त्यांना पावती दिली नाही. याप्रकरणी चव्हाण यांनी एमएफसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली.
कल्याण - रस्त्यावर न थुंकता व्यक्तीकडून 2 हजार रुपये दंडाची रक्कम स्वीकारत खंडणीखोर स्वच्छता मार्शल अटकेत https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 14, 2019