शेततळे घाेटाळ्यातील आराेपींना सात वर्षांनंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 05:32 PM2021-01-14T17:32:59+5:302021-01-14T17:33:55+5:30

Crime Scam : २५ लाखांचा अपहार, विर्दभातील आठ जिल्ह्यांतील आराेपींचा सहभाग

Arrested in farm scam after seven years | शेततळे घाेटाळ्यातील आराेपींना सात वर्षांनंतर अटक

शेततळे घाेटाळ्यातील आराेपींना सात वर्षांनंतर अटक

googlenewsNext
ठळक मुद्देनरेंद्र गणवीर रा. धामगाव जि. अमरावती, विश्वंभर तायडे रा. मलकापूर जि. बुलडाणा यांना अटक करण्यासाठी शहर पाेलिसांचे पथक गेले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात मित्रा संस्थेकडून शासन अनुदानावर शेततळे खाेदण्याचे काम घेण्यात आले हाेते. यासाठी संस्थेला २४ लाख ९८ हजाराचा निधी २०१३ मध्ये देण्यात आला. मात्र, संस्थेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी केवळ कागदाेपत्रीच शेततळे दाखवून निधी हडपला. या प्रकरणी मित्रा संस्थेचे विभागीय प्रमुख ओमदेवसिंग चुडासमा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. त्यानंतर याचा काेणीच तपास केला नाही. सात तपास अधिकारी बदलूनही गुन्हा प्रलंबित हाेता. आता आराेपींना अटक झाली आहे. राजू वामनराव इंगळे (४२) रा. नागपूर, विकास प्रभाकर डांगे (३६) रा. विडूळ जि. यवतमाळ, दिनेश बापूराव वांढरे (४१) रा. नागपूर, विजय माेतीराम बरडे (३७) रा. भंडारा, अभय भीमराव तायडे रा. अडाेळी जि. वाशिम, रेवदास पंचभाई रा. चंद्रपूर, ओमप्रकाश पाथाेडे रा. आमगाव जि. गाेंदिया असे अटक झालेल्या आराेपींची नावे आहेत. नरेंद्र गणवीर रा. धामगाव जि. अमरावती, विश्वंभर तायडे रा. मलकापूर जि. बुलडाणा यांना अटक करण्यासाठी शहर पाेलिसांचे पथक गेले आहे.

आराेपींनी मित्रा संस्थेच्या माध्यमातून शेततळे खाेदण्याचे काम घेतले. त्यांना २८३ शेततळे खाेदण्याचे काम दिले गेले हाेते. यापैकी काहीच शेततळे पूर्ण केले. उर्वरित शेततळे कागदाेपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखवून बिले काढली. हा प्रकार पुणे येथील पथकाच्या पाहणीतून निष्पन्न झाला. त्यानंतर या प्रकरणात ९ आराेपींविराेधात कलम ४१७, ४१८, ४२०, ४६८, ४७१, ४६५, २०१, १२० ब, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. २०१३ मध्ये दाखल गुन्ह्यात पाेलिसांनी काेणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे नऊ आराेपी बिनधास्तपणे फिरत हाेते. हा गुन्हा प्रलंबित असल्यासने त्याचा तपास पूर्ण करण्याचे निर्देश पाेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले. त्यावरून शहर ठाणेदार धनंजय सायरे यांनी पथकाचे गठन करून आठ जिल्ह्यात दडून असलेल्या आराेपींना शिताफीने अटक केली. यातील एका आराेपीची कारागृहात रवानगी झाली आहे. उर्वरित सहा आराेपींना पाेलीस काेठडीत ठेवण्यात आले आहे. इतर दाेन आराेपींना लवकरच अटक केली जाईल असे ठाणेदार धनंजय सायरे यांनी सांगितले.
बाॅक्स्

सात तपास अधिकारी बदलले
२०१३ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी चक्क सात अधिकारी बदलले. त्यानंतरही कारवाई झाली नाही. हा गुन्हा प्रलंबितच हाेता. अखेर आठव्या क्रमांकाच्या तपास अधिकारी ठरलेल्या ठाणेदार धनंजय सायरे यांनी आराेपींना अटक करून गुन्ह्याच्या तपासाला गती दिली आहे.

Web Title: Arrested in farm scam after seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.