बनावट पदवी प्रमाणपत्र विक्री करणाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 09:57 PM2019-03-06T21:57:19+5:302019-03-06T21:58:55+5:30

ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष - 1 चे पोलीस नाईक रविंद्र काटकर यांना माहिती मिळाली होती. 

Arrested gang who are selling a fake degree certificate | बनावट पदवी प्रमाणपत्र विक्री करणाऱ्यांना अटक

बनावट पदवी प्रमाणपत्र विक्री करणाऱ्यांना अटक

Next
ठळक मुद्दे४ मार्चला या संस्थेचे संचालक व कार्यकारी मंडळ यांच्या भा. दं. वि. कलम 420,465,468,471,34  प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. संस्थेचा ऍडमिन मोहमद अझहर मोहंमद इस्माईल अन्सारी (27) ( राहणार मोमीनपूर, नागपूर) आणि 5 महिला पदाधिकारी यांना अटक करण्यात आली आहे. 

ठाणे - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड इंजिनियरिंग नागपूर या संस्थेच्याकडून कोणालाही त्याची शैक्षणिक पात्रता नसताना त्याच्याकडून पैसे देऊन डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग, बी. टेक, एम .बी .ए ., बी. बी. ए. या कोर्सेसचे आणि 10 वी 12 वी दिल्ली बोर्डाचे मार्कशीट, सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष 1 ने अटक केली आहे .

ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष - 1 चे पोलीस नाईक रविंद्र काटकर यांना माहिती मिळाली होती. बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी आणि वरील संस्थेची माहिती देण्यासाठी कल्याण शीळ रोड धावडी नाका डोंबिवली पूर्व येथील मिर्ची हॉटेल येथे एक महिला येणार असून तिच्याकडे बरेच बनावट सर्टिफिकेट आहेत. त्या अनुषंगाने तिथे सापळा रचून  त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे बनावट हॉल तिकीट, मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र व बोर्ड सर्टिफिकेट पोलिसांनी मिळून आले. पोलिसांनी या संस्थेची सत्यता तपासण्यासाठी मुंबई येथील 'ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन' चर्चगेट आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्याकडून माहिती घेतली असता वरील संस्थेस कोणतीही मान्यता नसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार ४ मार्चला या संस्थेचे संचालक व कार्यकारी मंडळ यांच्या भा. दं. वि. कलम 420,465,468,471,34  प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. 

५ मार्च रोजी गुन्हे शाखेने नागपूर येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट यांच्या मुख्य कार्यालयावर व उप कार्यालयावर छापे मारून संस्थेचे 722 मार्कशीट , 214 प्रमाणपत्र , डॉ .बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे 15 मार्कशीट, 4 प्रमाणपत्र, छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी कानपुरचे 25 मार्कशीट व 37 प्रमाणपत्र, डॉ. सी. व्ही. रमन युनिव्हर्सिटी बिलासपुर छत्तीसगडचे 1 मार्कशीट, 74 प्रमाणपत्र असे एकूण 763 मार्कशीट आणि 353 प्रमाणपत्रे हस्तगत करण्यात आली.  या कारवाईदरम्यान या संस्थेचा ऍडमिन मोहमद अझहर मोहंमद इस्माईल अन्सारी (27) ( राहणार मोमीनपूर, नागपूर) आणि 5 महिला पदाधिकारी यांना अटक करण्यात आली आहे. 

 

Web Title: Arrested gang who are selling a fake degree certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.