जास्त फायद्याचे आमिष दाखवून कोटींचा गंडा घालणारं रॅकेट अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 07:47 PM2018-07-27T19:47:49+5:302018-07-27T19:48:16+5:30

गुन्हे शाखेच्या कक्ष - ३ ने केली दादरमधील ''मेसर्स मल्टी बिझनेस सर्व्हिसेस'' विरोधात केली कारवाई 

Arrested racket who duped crores by showing a more beneficial lure | जास्त फायद्याचे आमिष दाखवून कोटींचा गंडा घालणारं रॅकेट अटकेत 

जास्त फायद्याचे आमिष दाखवून कोटींचा गंडा घालणारं रॅकेट अटकेत 

Next

मुंबई - मनी ट्रेडिंग डॉट कॉम नावाची बोगस वेबसाईट सुरु करून त्यावरून लोकांना परकीय चलनात ट्रेडिंग करण्याची सोया उपलब्ध करून देऊन अशा प्रकारे ट्रेडिंग करून मोठा फायदा होतो अशी बतावणी करून ५०० लोकांना ६ कोटींचा गंडा घालणारे मोठे रॅकेट गुन्हे शाखेच्या कक्ष - ३ ने उध्वस्त केले आहे. याप्रकरणी एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

दादर येथील प्रीतम हॉटेलसमोर असलेल्या मेसर्स मल्टी बिझनेस सर्व्हिसेस नावाची कंपनीवर पोलिसांनी छापे टाकत अनेकांना कोटींचा चुना लावणारे रॅकेट कक्ष - ३ ने उध्वस्त केले आहे.  मनी ट्रेडिंग डॉट कॉम या वेबसाइटवरून ट्रेडिंग केल्याने मोठा फायदा होतो असे लोकांना खोटे आश्वासन देऊन तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करून सुरुवातीस लोकांना बोनस स्वरूपात पैसे मिळाल्याचे दाखविले. त्यानंतर अधिक गुंतवणूक करण्यास भाग पडून अनेक लोकांची फसवणूक केली. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात ९६ लॅपटॉप, १७ मोबाईल हस्तगत करण्यात आले. तसेच या कंपनीचे  संचालक असलेल्या  तन्वीर शेख (वय - ३२), असद शेख (वय - २७) आणि शाहरुख शेख (वय - २५ )  या तीन भावांना आणि व्यंकटाचलम मरिअप्पा  (वय - २८), फैयाज उमर शेख (वय - ४०), संजय वैष्णव (वय - २८), परवेज मकबूल खान (वय - ४०), मोहम्मद जाफर शेख (वय - २७), इम्रान मूकबल खान (वय ३४) आणि अजरुद्दीन दाऊदअली शेख (वय - २८) यांना अटक करण्यात आली आहे. या ठगांनी ५०० जणांकडून ६ कोटी ३६ लाख रुपये उकळले होते. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ३४ आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा २००००, ६६ (अ) (ब), ड  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Arrested racket who duped crores by showing a more beneficial lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.