अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा जेरबंद; पोलिसांना गंडवण्यासाठी 'सुसाईड नोट'चा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 09:00 PM2020-08-14T21:00:53+5:302020-08-14T21:05:16+5:30
या घटनेला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लखनौ/हापूर - उत्तर प्रदेशच्या हापूरमधील सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलीचे पालक आणि शेजार्यांच्या जबाबाच्या आधारे तीन रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आली होती. काही दिवसांपासून आरोपी दलपत याचा शोध घेणं सुरू झालं.
आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तीस हापूर पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. काल त्याने नदीच्या कडेला काही कपडे आणि 'सुसाइड नोट' ठेवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. चिठ्ठीत त्या आरोपीने आपण पोलिस चकमकीत मरणार नाही म्हणून तो आपला जीव गमावत आहे असं लिहिलं होतं. दलपत शोधण्यासाठी पोलिसांनी गेल्या आठवड्यात हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यात अनेक शोध मोहीम सुरू केल्या.
एका आठवड्यापूर्वी चिमुकल्या बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. घटनेला सात दिवस उलटले तरीही उत्तर प्रदेशपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी मोकाट होता. दरम्यान पोलिसांनी पीडित मुलगी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच (रेखाचित्र) प्रसिद्ध केली होती. तसेच हापूर पोलिसांना आरोपी दलपतचा फोटो हाती लागला असून त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी ५० हजार रुपयांचे इनाम जारी केले होते.
चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची माहिती देणाऱ्यास पोलीस देणार ५० हजार
६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार
दिल्लीपासून १०० किलोमीटरवर असलेल्या गर्ह मुक्षतेश्वर गावातून मुलीच्या घराबाहेरुनच अपहरण करण्यात आलं होतं. एका दुचाकीस्वाराने तिला उचलून नेलं होतं. मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावापासून थोड्याच अंतरावर झुडपात मुलगी बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी
सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत
डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको
सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...
Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु