लाखोंचे मोबाईल चोरणारा अटकेत; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 09:15 PM2019-10-17T21:15:08+5:302019-10-17T21:18:16+5:30
याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.
डोंबिवली - एका मोबाईल दुकानातून लाखोंचे मोबाईल चोरणाऱ्या मोहम्मद शेख (२२, रा. कळवा) या सराईत चोरटयाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.
डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन रोड परिसरातील एका मोबाईलचे दुकानाचे शटर तोडून चोरटयांनी सुमारे १७ लाख २९ हजाराचे मोबाईल चोरल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली होती. या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग करत होते. मोहम्मद हा कळवा येथील शांतीनगर परिसरात येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजु जॉन यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. याच माहितीच्या आधारे पथकाने गुरुवारी परिसरात सापळा रचत संशयीत आरोपी मोहम्मदला ताब्यात घेतले.
अशा प्रकारे गुन्हे शाखा घटक -३ कल्याणमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घरफोडी चोरीच्या गुन्हयातील अज्ञात आरोपीसंबंधी कोणताही धागादोरे उपलब्ध नसताना, अज्ञात आरोपीत यांचा तांत्रिक विश्लेषण आणि कळवा परिसरात अल्प कालावधीतच गुप्त बातमीदार तयार करून त्यांचे मार्फतीने अचूक माहिती काढून गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून, आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेऊन अतिशय अल्पकालावधीतच कौशल्यपुर्वक तपास करून इतर चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपीस पुढील तपासकामी विष्णुनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, सपोनि भुषण दायमा, पोउनि नितीन मुदगुन, पोउनि शरद पंजे, पोउनि दिधे, पो.हवा. भोसले, पो.हवा.घोलप, पो.हवा. मालशेट्टे, पो.हवा. पवार, पो.ना. शिर्के, पो.ना. निकुळे, पो.ना. खिलारे, पोना साळवी, पोना पाटील, पोना बंगारा, मपोना इरपाचे, पोशि राजपुत, पोशि ईशी, मपोशि रहाणे यांनी केलेली आहे.