सहाय्यक रचनाकारला लाच घेताना केले जेरबंद, एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 09:03 PM2020-09-15T21:03:17+5:302020-09-15T21:03:40+5:30

2500 रुपयाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकाराला रंगेहाथ पकडण्याची कारवाई मंगळवारी नगर रचना कार्यालय अमरावती येथे करण्यात आली.

Arrested for taking bribe to assistant designer, ACB action | सहाय्यक रचनाकारला लाच घेताना केले जेरबंद, एसीबीची कारवाई

सहाय्यक रचनाकारला लाच घेताना केले जेरबंद, एसीबीची कारवाई

Next
ठळक मुद्देसहाय्यक नगर रचनाकार म्हणून कार्यरत असलेले  मो.रफी मो.निसार कुरेशी (38 राहणार अमरावती )असे आरोपीचे नाव आहे.

अमरावती: खरेदी केलेल्या प्लॉटची विभागणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्याकरता 2500 रुपयाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकाराला रंगेहाथ पकडण्याची कारवाई मंगळवारी नगर रचना कार्यालय अमरावती येथे करण्यात आली.

सहाय्यक नगर रचनाकार म्हणून कार्यरत असलेले  मो.रफी मो.निसार कुरेशी (38 राहणार अमरावती )असे आरोपीचे नाव आहे. धामणगाव तालुक्यातील शिदोडी येथील 34 वर्षीय तक्रार कर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली होती.तक्रारदार व त्यांचे मित्र यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची विभाजन करण्याची परवानगीची फाईलवर साहेबांची सही घेऊन उपविभागीय कार्यालय चांदुर रेल्वे येथे पाठविण्याकरिता आरोपीने  तक्रारदार यांना चालान ऐडजस्ट करतो, पावती मिळणार नाही  असे म्हणून एकूण 2500 मागणी करून लाच स्वीकारली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी- पोलिस निरीक्षक रुपाली पोहनकर त्यांनी केली याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

 

Web Title: Arrested for taking bribe to assistant designer, ACB action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.