बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहायकास लाच घेताना रंगेहात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:42 AM2020-10-13T01:42:55+5:302020-10-13T01:43:10+5:30

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत कामांचे ठेके घेतलेल्या एका ठेकेदाराकडून  एका कामाचे बिल काढून घेण्यासाठी पागी याने सहा हजार रुपयांची लाच मागितली होती.

Arrested while accepting bribe from junior assistant of construction department | बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहायकास लाच घेताना रंगेहात अटक

बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहायकास लाच घेताना रंगेहात अटक

Next

पालघर:- जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कनिष्ठ सहायक प्रकाश पागी यास सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलूपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत कामांचे ठेके घेतलेल्या एका ठेकेदाराकडून  एका कामाचे बिल काढून घेण्यासाठी पागी याने सहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत विभागाला कळविल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तथ्यता तपासली असता, लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार लाचलूचपत विभागाने बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचून प्रकाश पागी यास रंगेहात लाच घेताना पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत साळुंखे व सहकारी कर्मचाऱ्यांनी आज दुपारी केली.

Web Title: Arrested while accepting bribe from junior assistant of construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.