अरुण गवळीला पुन्हा 28 दिवसांची रजा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 10:48 PM2020-07-07T22:48:45+5:302020-07-07T22:50:07+5:30

शिवसेना नेत्याच्या खुनाच्या गुन्ह्यात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. वकिलाचा युक्तीवाद मान्य करत गवळीला खंडपीठाने 28 दिवसांचा फर्लो मंजूर केला आहे.

Arun Gawli on 28 days Furlough Leave again | अरुण गवळीला पुन्हा 28 दिवसांची रजा

अरुण गवळीला पुन्हा 28 दिवसांची रजा

googlenewsNext

नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळीला पुन्हा फर्लोवर 28 दिवसांसाठी सोडण्यात आले आहे. नागपुरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज फरलो मंजुर केला आहे. मुलीचे लग्न झाल्यावर दीड महिन्यापूर्वीच गवळी कारागृहात परतला होता. आजारी पत्नीच्या सेवेसाठी गवळीला 45 दिवसांचा पेरोल मिळाला होता.


फरलो रजा मिळावी म्हणून 30 नोव्हेंबर 2019 ला गवळीने तुरुंग प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. परंतु 7 महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याच्या अर्जावर सुनावणी झाली नव्हती. आज यावर सुनावणी झाली. यावेळी गवळी याआधी 8 वेळा कारागृहाबाहेर पेरोलवर गेला होता. मात्र या काळात त्याच्याकडून कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा युक्तीवाद वकिलांनी केला. 


शिवसेना नेत्याच्या खुनाच्या गुन्ह्यात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. वकिलाचा युक्तीवाद मान्य करत गवळीला खंडपीठाने 28 दिवसांचा फर्लो मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाने २२ मे रोजी गवळीची पॅरोल मुदतवाढीची तिसरी याचिका फेटाळून त्याला २४ मे रोजी नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गवळी तळोजा कारागृहात गेला होता. परंतु, कोरोनामुळे त्याला कारागृहात प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी, त्याने चौथ्यांदा पॅरोल मुदतवाढ मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

 पत्नीच्या आजारपणामुळे गवळीला सुरुवातीला ४५ दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार त्याला २७ एप्रिल रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. परंतु, लॉकडाऊनमुळे उच्च न्यायालयाने त्याला पहिल्यांदा १० मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर लॉकडाऊन लांबले. परिणामी, न्यायालयाने गवळीच्या पॅरोलमध्ये दुसºयांदा २४ मेपर्यंत वाढ केली होती.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

मुंबई सावरली! आज दिवसभरात केवळ ७८५ नवे रुग्ण सापडले

एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर

CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला

चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान मागे आले!

एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले

वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन भारतात कधी येणार? लाँचिंगची तारीख Amazon नेच केली लीक

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत

Web Title: Arun Gawli on 28 days Furlough Leave again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.