खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:39 PM2020-07-30T17:39:31+5:302020-07-30T18:42:54+5:30

तळोजा कारागृहातील रुग्णालयातील एका रूममध्ये नारकरने कैद्यांना झोपण्यासाठी दिल्या जाणाऱ्या चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Arun Gawli gang's aids committed suicide in Taloja jail | खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या  

खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या  

googlenewsNext
ठळक मुद्देगवळी गँगचा हस्तक असलेल्या दिनेश नारकर (36) या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना दि.29 रोजी रात्री घडली.

वैभव गायकर 

पनवेल : तळोजा कारागृहात गवळी गँगचा हस्तक असलेल्या दिनेश नारकर (36) या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना दि.29 रोजी रात्री घडली. दि.20 रोजीच नारकरला तळोजा कारागृहात दाखल करण्यात आले होते.पत्नीची हत्येचा प्रयत्न  तसेच पोलिसांवर हल्ला करण्याचा गंभीर गुन्ह्याची नोंद नारकरच्या नावावर होती.

      

तळोजा कारागृहातील रुग्णालयातील एका रूममध्ये नारकरने कैद्यांना झोपण्यासाठी दिल्या जाणाऱ्या चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तत्काळ नारकरला जे जे रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याठिकाणी नरकरला मृत घोषित केले.संबंधित वृत्ताला कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी दुजोरा दिला आहे.अरुण गवळी गँगच्या हस्तक असलेल्या अरुण नारकर  याने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.खारघर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

 

Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न 

Web Title: Arun Gawli gang's aids committed suicide in Taloja jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.