Aryan Khan Arrest Updates: आर्यन खाननं कुठे अन् कसं लपवलं होतं ड्रग्ज? NCB च्या चौकशीत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:17 PM2021-10-04T12:17:33+5:302021-10-04T12:18:44+5:30
Aryan Khan Arrest Updates: रिपोर्टनुसार एनसीबीच्या छापेमारीत जहाजावर चरसशिवाय तीन अन्य प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मुंबई-गोवा क्रुझवर सुरु असणाऱ्या ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत ८ जणांना अटक केली आहे. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही अटक करण्यात आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. ही बातमी पसरताच अभिनेता सलमान खाननं मन्नत बंगल्यावर जात शाहरुख खानची भेट घेतली. NCB नं केलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
रिपोर्टनुसार एनसीबीच्या छापेमारीत जहाजावर चरसशिवाय तीन अन्य प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. आर्यन खानला एनडीपीएस एक्ट कलम २७ नुसार अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर आर्यनसह ३ आरोपींना मुंबईच्या जेजे रुग्णालयात नेण्यात आले. ज्याठिकाणी आरोपींची मेडिकल चाचणी करण्यात आली. एनसीबीच्या चौकशीत आर्यन खानने स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगत पुन्हा असं कृत्य करणार नाही अशी विनवणी केली. त्यानंतर पार्टीत ड्रग्ज घेतल्याची कबुली आर्यन खानने दिली. तसेच गेल्या ४ वर्षापासून ड्रग्ज घेत असल्याचंही त्याने कबुल केले. NCB च्या चौकशीत आणखी एक खुलासा झाला तो म्हणजे आर्यननं डोळ्याच्या लेन्स बॉक्समधून ड्रग्ज लपवून ठेवलं होतं. तर त्याच्यासोबत असलेल्या इतरांनी सॅनिटरी नॅपकिन आणि औषधांच्या डब्ब्यात ड्रग्ज आणि गांजा लपवला होता.
बॉलिवूडमधील नामांकितांचे खटले सहजपणे लढतात, देशभरातील प्रसिद्ध वकीलांपैकी एक. दिवसाला किती फी घेतात वाचा #AryanKhan#NCBhttps://t.co/P8zyKcE2xI
— Lokmat (@MiLOKMAT) October 4, 2021
जहाज जेव्हा सुरु झाले तेव्हा क्रुझवर हजर असलेल्यांनी ड्रग्सचं सेवन सुरु केले. तेव्हा NCB नं रंगेहाथ या सगळ्यांना पकडलं. NCB नं आर्यनचा फोनदेखील तपासला त्यात काही चॅट्स आढळले आहेत. त्यावरुन आर्यनचं ड्रग्स पॅडलर्ससोबत संवाद झाल्याचं उघड झालं. आर्यन नेहमी ड्रग्जचं सेवन करायचा. आर्यनजवळ १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि MDMA च्या २२ गोळ्या सापडल्या. या सर्वांची किंमत जवळपास १ लाख ३३ हजार इतकी आहे.
आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचासह ८ लोकांना ४ ऑक्टोबर दुपारपर्यंत NCB कस्टडीत ठेवणार आहे. आर्यन खानचे वकील सतीश माने-शिंदे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. ‘एनसीबी’ने दोन दिवसांची कोठडी मागितल्यावर त्यांनी आर्यनवरील कलमे जामीनपात्र असल्याचा बचाव केला. मात्र, कोर्टाने तो अमान्य केला. आर्यनच्या जामिनासाठी आज अर्ज केला जाणार आहे.