Aryan Khan Arrest Updates: आधी सलमान, मग संजय दत्त अन् आता आर्यन खानसाठी लढणार; जाणून घ्या, प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदेंबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 11:42 AM2021-10-04T11:42:53+5:302021-10-04T11:44:19+5:30

Aryan Khan Arrest Updates: ५६ वर्षीय प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदे यांना हाय प्रोफाईल केस लढणं नवीन नाही. माने-शिंदे यांनी याआधीही बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या कुटुंबासाठी वकिली केली आहे.

Aryan Khan Arrest Updates: Who is the famous lawyer Satish Mane-Shinde? | Aryan Khan Arrest Updates: आधी सलमान, मग संजय दत्त अन् आता आर्यन खानसाठी लढणार; जाणून घ्या, प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदेंबाबत

Aryan Khan Arrest Updates: आधी सलमान, मग संजय दत्त अन् आता आर्यन खानसाठी लढणार; जाणून घ्या, प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदेंबाबत

googlenewsNext

मुंबई – अमली पदार्थ विरोधी पथकाने क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली आहे. या प्रकरणी आर्यनची बाजू मांडण्यासाठी कोर्टात सतीश माने-शिंदे यांना नियुक्त केले आहे. सतीश माने-शिंदे तेच वकील आहेत ज्यांनी रिया चक्रवर्ती, सलमान खान, संजय दत्त यांची बाजू कोर्टात मांडली होती. ते बॉलिवूडसाठी सर्वात प्रभावी वकील मानले जातात.(Mumbai Cruise Drugs Case Updates)

कोण आहेत प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदे?

५६ वर्षीय प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदे यांना हाय प्रोफाईल केस लढणं नवीन नाही. माने-शिंदे यांनी याआधीही बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या कुटुंबासाठी वकिली केली आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला अटक केली होती. तेव्हा संजय दत्तला जामीन मिळवून दिल्यानंतर सतीश माने-शिंदे चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर हाय प्रोफाईल प्रकरणात ते देशातील टॉप वकिलांपैकी एक बनले.

२००२ मध्ये दारु पिऊन वेगाने गाडी चालवणे या प्रकरणात अभिनेता सलमान खान चांगलाच गोत्यात आला. तेव्हा सलमानला सतीश माने-शिंदे यांच्यामुळे जामीन मिळाला. त्यानंतर या प्रकरणात कोर्टाने सलमान खानला निर्दोष सोडलं. सध्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोईकचा खटला तेच लढवत आहेत. या दोन्ही भाऊ-बहिणींना एनसीबीनं मागील वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. सध्या दोघंही जामिनावर बाहेर आहेत. पालघरच्या लिचिंग प्रकरणातही विशेष वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

१९८३ मध्ये राम जेठमलानी यांच्या नेतृत्वात करिअरची सुरुवात

१९८३ मध्ये प्रसिद्ध वकील दिवंगत राम जेठमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश माने-शिंदे यांनी वकिलीची सुरुवात केली होती. जवळपास १० वर्ष ते जेठमलानी यांच्यासोबत काम करत होते. या काळात त्यांनी कायद्याचा प्रचंड अभ्यास करत राजकीय नेते, अभिनेते आणि अन्य मोठ्या सेलिब्रेटींचे खटले सांभाळले. सध्या मुंबईतील एक प्रसिद्ध वकील आणि विश्वासनीय चेहरा म्हणून सतीश माने-शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. माने-शिंदे त्यांच्या क्लाइंटकडून मोठी रक्कम फी म्हणून घेतात. बॉलिवूड लाइफच्या एका रिपोर्टमध्ये माने-शिंदे हे केस लढण्यासाठी दिवसाला १० लाख रुपये शुल्क आकारतात.

आर्यन खानची रविवारी रात्र तुरुंगात

NCB नं शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत बॉलीवूडचा ‘किंग’ शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. शाहरुखच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी अटक झाल्याचे समजताच बॉलीवूडसह देशभरात खळबळ उडाली. सर्व आरोपींना रविवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची कोठडी सुनावली. उर्वरित पाच जणांना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आर्यन खानतर्फे ॲड. सतीश माने-शिंदे यांनी कोर्टात बाजू मांडली. ‘एनसीबी’ने दोन दिवसांची कोठडी मागितल्यावर त्यांनी आर्यनवरील कलमे जामीनपात्र असल्याचा बचाव केला. मात्र, कोर्टाने तो अमान्य केला. आर्यनच्या जामिनासाठी सोमवारी अर्ज केला जाणार आहे.

Web Title: Aryan Khan Arrest Updates: Who is the famous lawyer Satish Mane-Shinde?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.