Aryan Khan Drugs Case: समीर वानखेडेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल करा - कनिष्क जयंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 09:49 AM2021-10-26T09:49:46+5:302021-10-26T09:50:32+5:30
Aryan Khan Drugs Case: ॲड. कनिष्क जयंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
मुंबई : क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असताना, ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवीत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह सहाजणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ॲड. कनिष्क जयंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटितपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचे अपहरण केले. त्याच्या वडिलांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.
या सर्व प्रकरणात वानखेडे यांची भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह माता रमाबाई पोलीस ठाणे, यलोगेट पोलीस ठाण्यातही तक्रार अर्ज दिला आहे.