Aryan Khan Drugs Case: आर्यन खानचे एनसीबीच्या समीर वानखेडेंना मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 10:23 PM2021-10-16T22:23:54+5:302021-10-16T22:24:32+5:30
Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: आर्यन खान जेव्हा एनसीबीच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे काऊन्सेलिंग करण्यात आले होते. हे प्रत्येक ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत केले जाते. आर्यन खानने वानखेडेंना मोठा शब्द दिला आहे.
बॉलिवूडचा किंग समजला जाणारा शाहरुख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ रेव्हा पार्टी ड्रग्ज प्रकरणी तुरुंगाची हवा खात आहे. अथक प्रयत्न करूनही त्याला सोडविणे शाहरुखला जमलेले नाही. आधी एनसीबी (Narcotics Control Bureau) आणि आता ऑर्थर रोड तुरुंगात आर्यन खान आहे. 20 ऑक्टोबरला त्याच्या जामिन अर्जावर निर्णय येण्याची शक्यता आहे. याआधी त्याचा जामिन नाकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आर्यन खानने एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडेंना मोठे वचन दिल्याचे समजते आहे.
एका वृत्तानुसार आर्यन खान जेव्हा एनसीबीच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे काऊन्सेलिंग करण्यात आले होते. हे प्रत्येक ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत केले जाते. तेव्हा एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना शब्द दिला आहे. ''यापुढे मी चांगले काम करेन आणि एक दिवस तुम्हाला माझ्यावर गर्व वाटेल'', असे आर्यनने म्हटल्याचे सांगितले जात आहे.
आर्यन खानने म्हटले की, तुरुंगातून बाहेर आल्यावर मी एक चांगला व्यक्ती बनेन. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत, गरीब लोकांना मदत करेन. तुम्हाला एक दिवस माझा गर्व वाटेल. आर्यन खानची वानखेडेंसोबत एका एनजीओच्या सदस्यांनी काऊंसिलिंग केल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईच्या सत्र न्यायालयाने 14 ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामिनाच्या सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. दसरा आणि विकेंडच्या सुट्या आदी आल्याने न्यायालय बंद राहणार आहे. यामुळे 20 ऑक्टोबरला त्याच्या जामिनावर निर्णय देण्यात येणार आहे. न्यायाधीशांनी मी व्यस्त आहे, निकाल देण्याचा प्रयत्न करेन असे म्हटले आहे. यामुळे 20 तारखेला जामिन होईल की नाही यावर देखील साशंकता आहे.