Aryan Khan: 'रेड' शब्द ऐकताच त्या क्रूझवरील अनेक जण पसार; आर्यन खान सापडला; NCBची यादी तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 05:00 PM2021-10-04T17:00:05+5:302021-10-04T17:27:28+5:30
NCB again Raid on cruise where Aryan Khan detained: अधिकाऱ्यांनी या वेळी क्रूझवर असलेल्या सर्व प्रवाशांची यादी तयार केली आहे. तसेच आणखी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यादीतील काही लोक फरार झाले आहेत.
मुंबई-गोवा-मुंबई अशा क्रूझवर रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. एनसीबीने त्यावर छापा मारून शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. यामुळे ही पार्टी हाय प्रोफाईल ठरली असून आर्यनच्या मोबाईलमध्ये कोड वर्ड सापडले आहेत. यामुळे तो आणखी अडचणीत येण्याची शक्यता असून एनसीबीने त्याच क्रूझवर पुन्हा एकदा छापा मारला आहे. (Maharashtra: A team of NCB officers conducts search at the cruise ship in Mumbai where drugs were seized, takes 8 more people into custody)
एनसीबीने या क्रूझवर सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पुन्हा छापा मारला आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. याचबरोबर एनसीबीच्या टीमने आणखी आठ जणांना बोटीवरून ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
शनिवारी रात्री एनसीबीने या क्रूझवर छापा मारला होता. त्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा सापडला होता. त्याच्यासोबत आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीचे अखिदारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 20 जणांची टीम क्रूझवर चौकशीसाठी गेली होती. मात्र, तिथे त्यांना मोठे घबाड हाती लागले आहे. मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा सापडला आहे.
Maharashtra: A team of NCB officers conducts search at the cruise ship in Mumbai where drugs were seized, takes 8 more people into custody
— ANI (@ANI) October 4, 2021
अधिकाऱ्यांनी या वेळी क्रूझवर असलेल्या सर्व प्रवाशांची यादी तयार केली आहे. तसेच आणखी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यादीतील काही लोक फरार झाले आहेत. त्यांची दिल्ली, गोवा आणि बंगळूरू आदी शहरांत शोधाशोध सुरु करण्यात आली आहे. सुत्रांनुसार एनसीबीने ज्या लोकांना आज ताब्यात घेतले आहे ते लोक ग्रूपने या क्रूझवर आले होते. एनसीबीने छापा टाकल्याचे जसे त्यांना समजले तसे ते तेथून पसार झाले.
एनसीबीने आता यादी तयार केली असून त्याद्वारे फरारी लोकांचा शोध सुरु केला आहे. पकडलेल्या लोकांसोबत कोण कोण क्रूझवर आले होते, कोण कसे गायब झाले याची माहिती एनसीबी घेत आहे, असे सूत्रांनी अमर उजालाला सांगितले. या यादीत अनेक मोठी नावे असण्याची शक्यता वर्तविण्य़ात आली आहे. यामुळे ठिकठिकाणी एनसीबीने छापेमारी सुरु केली आहे.