नाम साधर्म्यातून पीएफवर तब्बल सव्वा कोटींचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 09:33 AM2023-03-10T09:33:37+5:302023-03-10T09:36:20+5:30

पोलिसांत तक्रार दाखल.

As much as 1 25 crore was stolen from the PF due to name similarity cyber fraud | नाम साधर्म्यातून पीएफवर तब्बल सव्वा कोटींचा डल्ला

नाम साधर्म्यातून पीएफवर तब्बल सव्वा कोटींचा डल्ला

googlenewsNext

मुंबई : एकसारख्या नावाचा फायदा घेत एका ८८ वर्षीय बँक खातेदाराच्या मुलाच्या पीएफ खात्यातील सव्वा कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार नरिमन पॉइंट येथे समोर आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. 

हनुमंत रामक्रिष्णा प्रसाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अमित हनुमंत प्रसाद याचे नरिमन पॉईंट येथील बँक खात्यात पीएफ खाते आहे. बँकेतील अनोळखी व्यक्ती अमित विजय प्रसाद याने तोच पीपीएफधारक असल्याचे भासवून मुलाच्या पीएफ खात्यातील रकमेवर हात साफ केला. खात्यातील जवळपास १ कोटी ३१ लाख ९७ हजार ६७९ रुपये गेल्या वर्षी २ ऑगस्ट रोजी त्याच्या बँक खात्यात वळती झाल्याचे समोर आले. त्यांनी, बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: As much as 1 25 crore was stolen from the PF due to name similarity cyber fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.