सुरत बलात्कारप्रकरणी आसारामचा मुलगा नारायण साईला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 06:07 PM2019-04-30T18:07:25+5:302019-04-30T18:11:13+5:30
सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप नारायण साईवर आहे.
गुजरात - २०१३ सालच्या सुरतमध्ये झालेल्या बलात्कारप्रकरणीआसारामचा मुलगा नारायण साईला न्यायालयाने २६ एप्रिलला दोषी ठरवले. आज सुरत सत्र न्यायालयाने नारायण साईला या बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप नारायण साईवर आहे. नारायणचा सहकारी गंगा, जमुना आणि हनुमान हे देखील यामध्ये दोषी ठरवण्यात आले आहेत. नारायण साईच्या चार साथीदारांना प्रत्येकी १०-१० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी बलात्कार, लैंगिक शोषण, अनैतिक संबंध बनवणे आणि इतर आरोप प्रकरण सुरत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये सूरत पोलिसांनी ही तक्रार दाखल करुन घेतली. यामधील एक तक्रार ही आसाराम तर दुसरी तक्रार ही नारायण साई याच्याविरूद्ध होती. दोन बहीणींपैकी लहान बहिणीने नारायण साईवर आरोप केला होता. 2002 ते 2005 पर्यंत आपले सलग लैंगिक शोषण केल्याचा आरोप नारायणवर होता. यावेळी पीडित सूरत येथील आश्रमात राहत होती.
Gujarat: Narayan Sai, son of Asaram who was found guilty in a rape case by Surat Sessions Court, has been sentenced to life imprisonment. (file pic) pic.twitter.com/R80kNXo5v6
— ANI (@ANI) April 30, 2019
गुजरात - बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सूरत सत्र न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) April 30, 2019