अपहरणानंतर हाती आली मुलीच्या मृतदेहाची राख; मंत्र-तंत्रातून जाळल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:34 PM2020-06-27T23:34:31+5:302020-06-28T08:15:07+5:30

उत्तर प्रदेशातील घटना । एक संशयित ताब्यात

The ashes of the girl's body were recovered after the abduction; Suspicion of burning through mantra-tantra | अपहरणानंतर हाती आली मुलीच्या मृतदेहाची राख; मंत्र-तंत्रातून जाळल्याचा संशय

अपहरणानंतर हाती आली मुलीच्या मृतदेहाची राख; मंत्र-तंत्रातून जाळल्याचा संशय

Next

हमीरपूर : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलीच्या जळालेल्या मृतदेहाची राख सापडली असून, याप्रकरणी एका तरुणास संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

हमीरपूरमधील मौदहा येथील रागौल मोहल्ल्यातून एका भटक्या कुटुंबातील मुलीला रात्री ती झोपेत असताना उचलून नेण्यात आले होते. शुक्रवारी रात्री या मुलीच्या जळालेल्या मृतदेहाची राख एका घरात आढळून आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी याच घरातील एका तरुणास ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक श्लोककुमार यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या विक्रम लोहार याची पूनम नावाची आठ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावरील एका घरात तपासणी करण्यात आली. घरात मुलीच्या जळालेल्या मृतदेहाची राख आढळून आली. हाडांचे छोटे छोटे तुकडेही राखेत सापडले. जप्त राख आणि हाडे फोरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. राख जप्त झालेले घर रोहारी गावच्या राजाराम नावाच्या व्यक्तीचे आहे. घरात असलेला त्याचा मुलगा संतोष (३०) याला चाकैशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मंत्र-तंत्रातून जाळल्याचा संशय
पोलिसांनी सांगितले की, घरातून हळद आणि इतर काही पूजा साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यावरून हे प्रकरण मंत्र-तंत्राशी संबंधित असावे, असा अंदाज आहे. संशयित आरोपी संतोष याला नशा-पाण्याचा नाद असल्याचेही समोर आले आहे.

पोलीस उपअधीक्षक सौम्या पाण्डेय यांनी सांगितले की, संतोष याच्या शरीरयष्टीची एक व्यक्ती मुलीला उचलून घेऊन चालल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आरोपी संतोष घरात एकटाच राहत होता. त्याची बायको त्याला सोडून गेलेली आहे. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: The ashes of the girl's body were recovered after the abduction; Suspicion of burning through mantra-tantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस