अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात; सात वर्षांपासून संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:03 AM2023-07-14T10:03:16+5:302023-07-14T10:03:45+5:30

पोलिसांनी तपास करण्यास चालढकल केल्याने गोरे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली.

Ashwini Bidre murder case hearing in final stages; Struggle for seven years | अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात; सात वर्षांपासून संघर्ष

अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात; सात वर्षांपासून संघर्ष

googlenewsNext

उद्धव गोडसे 

कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचे अपहरण झाल्याची फिर्याद मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात दाखल होऊन शुक्रवारी (दि. १४) सात वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या सात वर्षांत गुन्हा दाखल करण्यापासून ते तपास आणि न्यायालयीन कामकाजासाठी बिद्रे-गोरे कुटुंबीयांना सातत्याने पाठपुरावा करावा लागला. या  खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे.

आळते (ता. हातकणंगले) येथील सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचे कळंबोली येथून २०१५मध्ये अपहरण झाले होते. शोध घेऊनही त्या सापडत नसल्याने अखेर त्यांचे पती राजू गोरे यांनी पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद कळंबोली पोलिसांत दिली. पोलिसांनी तपास करण्यास चालढकल केल्याने गोरे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली. तपास अधिकारी नीलेश राऊत आणि संगीता अल्फान्सो यांनी केेलेल्या तपासात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय श्यामसुंदर कुुरुंदकर (रा. ठाणे, मूळ कोल्हापूर) याने बिद्रे यांचा खून करून साथीदारांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कुुरुंदकर याच्यासह राजू ऊर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर या चौघांना अटक केली. 

सात वर्षांचा संघर्ष
गुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपी कुरुंदकर हा पोलिस दलात वरिष्ठ निरीक्षक होता. अनेक बड्या अधिकाऱ्यांशी त्याचे लागेबांधे होते. दुसरा संशयित राजू पाटील हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा निकटवर्तीय होता.  

पळणीकरचा कबुलीजबाब
कुुरुंदकर याचा मित्र महेश पळणीकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केल्यानंतर त्याने बिद्रे यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली.  

Web Title: Ashwini Bidre murder case hearing in final stages; Struggle for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.