अश्विनी बिद्रे हत्याकांड : १३९ साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 21:07 IST2019-09-23T21:03:37+5:302019-09-23T21:07:03+5:30
वकील प्रसाद पाटील आणि वकील भानुशाली हे आरोपीचे वकील म्हणून खटला लढवत आहेत.

अश्विनी बिद्रे हत्याकांड : १३९ साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर
पनवेल - राज्यभर गाजलेल्या अश्विनी बिन्द्रे हत्याकांडातील सुनावणी सोमवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्या न्यायालयासमोर पार पडली. यावेळी प्रथमच सरकार पक्षांकडून सुमारे १३९ साक्षीदारांची यादी न्यायालायसमोर सादर करण्यात आली.
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि रायगड जिल्हा सरकारी वकील संतोष पवार हे या सुनावणी दरम्यान उपस्थित होते. या प्रकरणातील पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार असून न्यायालयाने पोलिसांना हत्याकांडातील मुद्देमाल कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. वकील प्रसाद पाटील आणि वकील भानुशाली हे आरोपीचे वकील म्हणून खटला लढवत आहेत. या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला देखील सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर करण्यात आले होते.