दुचाकी लवकर परत न दिल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 02:02 PM2019-02-05T14:02:18+5:302019-02-05T14:03:37+5:30
दुचाकी लवकर परत दिली नाही, याबद्दल विचारणा केल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच लोखंडी कोयत्याने खांद्यावर मारून दुखापत केली
पिंपरी : दुचाकी लवकर परत दिली नाही, याबद्दल विचारणा केल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच लोखंडी कोयत्याने खांद्यावर मारून दुखापत केली. ही घटना चिखली येथे रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अतिश शरद चव्हाण या आरोपीसह अन्य दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय बालाजी महाजन (वय १७,रा.हरगुडे वस्ती, चिखली) असे फिर्यादीचे नाव आहे. फियादीर्चा वाहने दुरुस्तीचा (गॅरेज ) व्यवसाय आहे. आरोपीने फिर्यादीकडील दुचाकी काही कालावधीसाठी नेली. बराच कालावधी गेल्यानंतर आरोपी दुचाकी घेऊन परत आला. त्यामुळे फियादीर्ने दुचाकी परत आणुन देण्यास विलंब का झाला. अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने आरोपीने चिडून जाऊन फिर्यादीला शिवीगाळ तसेच मारहाण केली. लोखंडी कोयत्याने खांद्यावर मारुन फिर्यादीस जखमी केले. आरोपीच्या अन्य दोन साथीदारांनी फिर्यादीला हाताने पकडून ठेवत मारहाण केली. या प्रकरणी चिखली पोलीस अधिक चे तपास करीत आहेत