चॉकलेट देण्याचा बहाणा करुन मुलीवर अत्याचार; धुळे तालुक्यातील घटना

By देवेंद्र पाठक | Published: September 21, 2023 03:25 PM2023-09-21T15:25:24+5:302023-09-21T15:25:34+5:30

सोनगीर पोलिसात गुरुवारी पहाटे पावणे तीन वाजता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

Assaulting a girl on the pretext of giving chocolate; Incidents in Dhule Taluk | चॉकलेट देण्याचा बहाणा करुन मुलीवर अत्याचार; धुळे तालुक्यातील घटना

चॉकलेट देण्याचा बहाणा करुन मुलीवर अत्याचार; धुळे तालुक्यातील घटना

googlenewsNext

धुळे : एका पाच वर्षाच्या चिमुकलीला चाॅकलेट देण्याचा बहाणा करुन शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना धुळे तालुक्यातील एका गावात बुधवारी सायंकाळी घडली. सोनगीर पोलिसात गुरुवारी पहाटे पावणे तीन वाजता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

धुळे तालुक्यातील एका गावात बाहेरील राज्यातील एक परिवार हातमजुरी कामानिमित्त वास्तव्यास आहे. त्यांना एक पाच वर्षाची मुलगी आहे. त्यांच्या घराशेजारी बाहेरील राज्यातील तरुण राहतो. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचा बहाणा करुन घरी बोलावून घेतले. घरात बोलविल्यानंतर त्याने बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना धुळे तालुक्यातील एका गावात बुधवारी सायंकाळी ७ ते साडेसात वाजेच्या सुमारास घडला. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलगी घरी आली आणि घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. 

घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीला सोबत घेत महिलेने सोनगीर पोलिस ठाणे गाठले आणि फिर्यार दाखल केली. त्यानुसार, गुरुवारी पहाटे पावणे तीन वाजता संशयित तरुणाविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड घटनेचा तपास करीत आहे.

Web Title: Assaulting a girl on the pretext of giving chocolate; Incidents in Dhule Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.