तळेगाव दाभाडे येथे बरदिवसा महिलेला मारहाण करत सुमारे ४ लाख ७६ हजारांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 06:43 PM2019-04-30T18:43:08+5:302019-04-30T18:44:41+5:30

शहरातील मुख्य बाजारपेठेतील भरदिवसा एका महिलेच्या घरात घुसून हातपाय बांधत त्यांना मारहाण करण्यात आली...

assaulting to women and after 4 lakh 76 thousand matreials theft In Talegaon Dabhade | तळेगाव दाभाडे येथे बरदिवसा महिलेला मारहाण करत सुमारे ४ लाख ७६ हजारांचा ऐवज लुटला

तळेगाव दाभाडे येथे बरदिवसा महिलेला मारहाण करत सुमारे ४ लाख ७६ हजारांचा ऐवज लुटला

Next

तळेगाव दाभाडे : शहरातील मुख्य बाजारपेठेतील भरदिवसा एका महिलेच्या घरात घुसून हातपाय बांधत त्यांना मारहाण करण्यात आली. त्याचवेळी दोन अज्ञात चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १ लाख ६६ हजार असा सुमारे ४ लाख ७६ हजारांचा ऐवज लुटला.जबरी चोरीचा हा प्रकार मतदानाच्या दिवशी सोमवारी सकाळी ११च्या सुमारास घडला.या संदर्भात सुरय्या अब्दुल तांबोळी (वय. ६५ रा. सोमवार पेठ, तळेगाव दाभाडे, ता.मावळ) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदरमहिला ही पूजेचे साहित्य व विड्याची पाने विकण्याचा व्यवसाय करते. लोकसभेची निवडणूक असल्याने  उन्हाच्या आत सुरय्या तांबोळी या मतदान करण्यास जाण्याच्या तयारीत होत्या.तेवढ्यात दोघे अज्ञात घरात घुसले मतदान करण्यास नेण्यासाठी हे दोघे आले असावेत असे तांबोळी यांना प्रथम वाटले. मात्र, चोरट्यांनी बेडरूममध्ये नेऊन तेथील स्कार्फने तिचे तोंड बांधले.  दोरीच्या सहाय्याने हातपाय बांधून पाठीवर मारहाण केली. दमदाटी करीत आणि जीवे मारण्याची धमकी देत मंगळसुत्र हिसकावले.जबरदस्तीने कपाटातील १लाख ६६ हजार रुपये रोख,सोन्याच्या बांगडया,हार,झुबे,वेल असा १५ तोळे सोन्याच्या दागिण्यासह सुमारे  ४ लाख ७६ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. त्यानंतर महिलेचा आरडाओरडा एकूणसमोरच दुकानात असलेले माजी नगरसेवक अरुण शहा आणि त्यांच्या किसन नावाच्या एका सहका?्याने सदर महिलेची सुटका केली.दोन चोरट्यांपैकी एक जण २५ ते ३० वयोगटातील असून अंगाने जाड,उंच ,रंगाने काळा आहे.त्याने निळ्या रंगाची पॅन्ट,मिल्ट्री रंगाचा टी शर्ट घातला होता..दुसरा चोरटा ३०ते ३५ वयोगटातील असून त्याने खाकी रंगाची पॅन्ट आणि हाल्फ शर्ट घेतला होता.जबरी चोरीच्या या घटनेमुळे तळेगाव शहर परिसरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीस उपनिरीक्षक के.एस.गवारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: assaulting to women and after 4 lakh 76 thousand matreials theft In Talegaon Dabhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.