कौटुंबिक कलहातून पत्नींवर जीवघेणे हल्ले, दोन वेगवेगळया घटनांनी उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 09:17 PM2022-02-08T21:17:59+5:302022-02-08T21:18:24+5:30

Family Disputes : या दोन्ही घटनांप्रकरणी अनुक्रमे रामनगर आणि विष्णुनगर पोलिस ठाण्यात पतीं विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

Assulting to wives from family disputes, two separate incidents sparked outrage | कौटुंबिक कलहातून पत्नींवर जीवघेणे हल्ले, दोन वेगवेगळया घटनांनी उडाली खळबळ

कौटुंबिक कलहातून पत्नींवर जीवघेणे हल्ले, दोन वेगवेगळया घटनांनी उडाली खळबळ

googlenewsNext

डोंबिवली:  चारीत्र्याच्या संशयावरून झालेल्या वादात भररस्त्यात पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी पुर्वेतील दत्तनगरमध्ये घडली तर पश्चिमेतील सरोवरनगरमध्ये घडलेल्या दुस-या घटनेत कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी घडला. या दोन्ही घटनांप्रकरणी अनुक्रमे रामनगर आणि विष्णुनगर पोलिस ठाण्यात पतीं विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.


पुर्वेकडील दत्तनगरमध्ये राहणारा सोमनाथ देवकर हा पत्नी वंदना हिच्यावर चारीत्र्यावरून संशय घ्यायचा तसेच पैसे चोरते असा आरोप करुन तीला मारहाण  करायचा. या त्रासाला कंटाळून वंदना हिने सोमनाथची तक्रार पोलिस ठाण्यात करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वंदना पोलिस ठाण्यात जाण्यासाठी रिक्षात बसली असता पाठिमागून आलेल्या सोमनाथने वंदनावर चाकूने सपासप वार केले आणि पसार झाला. यात तीच्या मानेवर, पायावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. जखमी अवस्थेतील वंदनाला रिक्षाचालक रूग्णालयात उपचारासाठी नेत असताना गस्तीवरील पोलिसांनी रिक्षा थांबवून  विचारणा केली. रिक्षाचालकाने घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांकडून तीला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू प्रकृती गंभीर बनल्यावर तीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात हलविण्यात आले.

पश्चिमेतही पत्नीवर वार
शिवाजी भुजंग यानेही पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. भुजंग पती-पत्नी गेल्या तीन चार वर्षापासून वेगळे राहत आहेत. शिवाजी हे कोणताही कामधंदा करीत नाहीत. यावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद व्हायचे. त्यामुळे दोघे वेगवेगळे रहायचे. सोमवारी शिवाजी हे घरी आले आणि त्यांनी घरगुती वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. ती यात गंभीर जखमी झाली असून मुलगा सागर याच्या तक्रारीवरून शिवाजी याच्या विरोधात विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे.

Web Title: Assulting to wives from family disputes, two separate incidents sparked outrage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.