देशी बनावटीच पिस्तुल अन् काडतुसासह दोघांना पकडले, पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 05:38 PM2023-04-11T17:38:45+5:302023-04-11T17:39:18+5:30

शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना गुप्त बातमीदाराने २ इसम दुचाकी गाडीने शिरपूर फाट्याकडून धुळ्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस घेवून जात असल्याची माहिती दिली.

At Shirpur, two people were caught with country-made pistols and cartridges | देशी बनावटीच पिस्तुल अन् काडतुसासह दोघांना पकडले, पोलिसांची कारवाई

देशी बनावटीच पिस्तुल अन् काडतुसासह दोघांना पकडले, पोलिसांची कारवाई

googlenewsNext

शिरपूर (जि.धुळे) :  देशी बनावटी पिस्टल काडतुससह घेवून जाणाऱ्या  २ युवकांना शिरपूर पोलिसांनी जेरबंद केले.  त्यांच्याकडून दुचाकी गाडीसह पिस्टल, काडतुस, मोबाईल असा एकूण ८७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवार १० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मुबंई-आग्रा महामार्गावरील शिरपूरजवळील  हॉटेल गॅलेक्झीसमोर ही कारवाई करण्यात आली.

शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना गुप्त बातमीदाराने २ इसम दुचाकी गाडीने शिरपूर फाट्याकडून धुळ्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस घेवून जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक आगरकर यांनी लागलीच पोलिस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, पोउनि गणेश कुटे यांच्यासह डीबी पथकाने टोलनाकाजवळ सापळा रचला़ काहीवेळाने शिरपूरकडून २ युवक दुचाकी गाडी क्रमांक एम़एच़-२०-एफएन-५१९३ ने येत असल्याचे दिसतात पोलिसांनी त्यांची चौकशी केली.  सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिलीत. पोलिसांनी  त्यांची अंगझडती घेतली असता विना परवाना देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे, मोबाईल मिळून आले. २५ हजाराची पिस्टल, १ हजाराचे काडतुस, ५० हजाराची दुचाकी गाडी व ११ हजाराचे २ मोबााईल असे एकूण ८७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोकॉ प्रशांत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अरबाज इस्माइल शेख (२१) व शाबीर शहा सगीर शहा (१९,दोन्ही राहणार अंबिकानगर शिरपूर) यांच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदवून त्या दोघांना जेरबंद करण्यात आले़ पुढील तपास पोउनि गणेश कुटे हे करीत आहेत.

Web Title: At Shirpur, two people were caught with country-made pistols and cartridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.