अरेच्चा! विमानतळावर IPS अधिकाऱ्याची तपासली बॅग, त्यात सापडल्या वाटाण्याच्या शेंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 10:15 PM2022-03-17T22:15:57+5:302022-03-17T22:16:50+5:30
At the airport, the IPS officer checked the bag : जयपूर विमानतळावर आयपीएस अरुण बोथरा यांची बॅग तपासण्यात आली. त्यात आश्चर्य वाटणारी भाजी सापडली आणि त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
जयपूर - कोणत्याही विमानतळावर प्रवाशांच्या बॅगेची तपासणी होते. ठराविक वजनापेक्षा जास्त वजन आहे का ? तसेच त्यात ड्रग्ज किंवा इतर बंदी असलेल्या वस्तू असेल तर त्या प्रवाशा कसून चौकशी केली जाते. एखादी वस्तू परदेशातून आणली असल्यास त्या वस्तुची कस्टम ड्युटी भरली नसेल तर कारवाई केली जाते. यासाठी कस्टम अधिकारी, एआययूचे अधिकारी चौकस नजर ठेवून असतात. मात्र, जयपूर विमानतळावर आयपीएस अरुण बोथरा यांची बॅग तपासण्यात आली. त्यात आश्चर्य वाटणारी भाजी सापडली आणि त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
आयपीएस बोथरा यांना जयपूर विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी त्यांची बॅग उघडण्यास सांगितली. दरम्यान त्यांच्या बॅगेत हिरव्या वाटाण्याच्या शेंगा (मटार) मोठ्या प्रमाणावर आढळल्या. त्यांनी याचा फोटोही ट्विटरवर शेअर केला असून त्याचे मीम्स व्हायरल होत आहेत. आयपीएस अरुण बोथरा हे परिवहन आयुक्त म्हणून ओडिसामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांची बॅग उघडलेली दिसत असून हिरव्या वाटण्याच्या शेंगांनी ती भरलेली दिसत आहे.
Security staff at Jaipur airport asked to open my handbag 😐 pic.twitter.com/kxJUB5S3HZ
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) March 16, 2022
ज्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या बॅगेत हिरव्या वाटाण्याच्या शेंगाची भाजी पाहिली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. अरुण बोथरा यांनी सांगितले की, या शेंगा त्यांना ४० रुपये किलो इतक्या दराने खरेदी केल्या.